Lok Sabha Election 2024 Saam tv
देश विदेश

Lok Sabha Election 2024 : लोकसभेपूर्वीच पश्चिम बंगालच्या CM ममता बॅनर्जींना मोठा धक्का; TMCच्या २ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभेत तिकीट न मिळाल्याने दोन बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अर्जुन सिंह आणि दिब्येंदु अधिकारी यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Vishal Gangurde

Lok Sabha Election Latest News :

देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. देशात शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभेपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आगामी लोकसभेत तिकीट न मिळाल्याने दोन बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अर्जुन सिंह आणि दिब्येंदु अधिकारी यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जारी केली. या यादीत सुवेन्दू अधिकारी अधिकारी यांचे बंधू दिब्येंदू यांना तिकीट मिळालं नाही. त्यानंतर दिब्येंदू हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. याचदरम्यान, दिब्येंदू अधिकारी यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला.

अर्जुन सिंह यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

तृणमूल काँग्रेसच्या यादीत बैरकपूरमधून खासदार अर्जुन सिंह यांना तिकीट मिळालं नाही. ममता बॅनर्जी यांनी त्यांचं तिकीट कापून मंत्री पार्थ भौमिक यांना उमेदवारी दिली. त्यानंतर अर्जुन सिंह हे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. यानंतर अर्जुन सिंह यांनी दिब्येंदू यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला.

अर्जुन सिंह यांची घरवापसी

अर्जुन सिंह यांनी २०२९ मध्ये लोकसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढली होती. त्यावेळी त्यांनी निवडणूकही जिंकली होती. यानंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान अर्जुन सिंह यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, सुवेन्दू अधिकारी यांनी भाजपमध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्याने टीएमसीने त्यांचा भाऊ आणि वडिलांचं तिकीट कापलं. तर त्यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी आधीच लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.

अर्जुन सिंह यांची टीएमसीवर टीका

भाजपमध्ये प्रवेश करताच अर्जुन सिंह यांना तृणमूल काँग्रेसवर टीका केली. 'मी २०१९ मध्ये खासदार झालो. पक्षातील कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी भाजपपासून लांब राहिलो. तृणमूल काँग्रेस पोलीस आणि गुंडांच्या मदतीने सत्तेत राहू इच्छित आहे. याचं उदाहरण संदेशखालीमध्ये पाहिलं. फक्त एक संदेशखाली नाही. पश्चिम बंगालच्या सीमाभागातील लोक दहशतीत राहत आहेत',असे अर्जुन सिंह म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elvish Yadav: 'मी आणि माझे कुटुंब...'; गोळीबाराच्या घटनेनंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

Police Attacked : मोर्चाला हिंसक वळण, पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार, नेमकं काय घडलं? VIDEO

Maharashtra Rain Live News: मुंबईत पावसाचा जोर कायम, ठाणे - नवी मुंबईतील शाळांना २ दिवस सुट्टी जाहीर

लातूरमध्ये पावसाचा हाहाकार! अनेकांचे संसार उघड्यावर; दोन गावांना पुरानं वेढलं, ७० शेळ्या, ७ बैल वाहून गेले

Heavy Rain : अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपले; गावांमध्ये शिरले पाणी, वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT