PM Narendra Modi : 'जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत कोणालाही धक्का लागणार नाही'; PM नरेंद्र मोदींची गॅरंटी

PM Narendra Modi On DMK, INDIA : यापुढेही जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत तामिळनाडुच्या संस्कृतीला कोणताही धक्का लागणार नाही, असं नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलं.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Saam Digital
Published On

PM Narendra Modi

तामिळनाडुतील जाहीर सभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडी आणि द्रमुकवर जोरदार हल्ला चढवला. जलीकट्टू तामिळनाडुचा गौरव आहे, मात्र तामिळनाडुच्या संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असताना द्रमुक आणि काँग्रेसने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलं. एनडीएच्या सरकारने जल्लीकट्टूचा सण उत्साहात साजरा करण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. यापुढेही जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत तामिळनाडुच्या संस्कृतीला कोणताही धक्का लागणार नाही, असं नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलं.

मोदींनी यावेळी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा मुद्दाही उपस्थित केला. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी मी येथे आलो होतो. येथील प्राचीन तीर्थक्षेत्रांना भेट दिली होती, मात्र द्रमुकने मला अयोध्येतील अभिषेक सोहळा पाहण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला चांगलंच फटकारलं होतं. तामिळनाडूतील हा सत्ताधारी पक्ष इंडिया आघाडीत सामील असल्याची घणघाती टीका त्यांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीत संसदेची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. संसदेच्या उद्घाटनावेळी तमिळ संस्कृतीचे प्रतीक आणि या भूमीचे वरदान असलेल्या सेंगोलची स्थापना केली. मात्र या लोकांनी त्यावर बहिष्कार टाकला. सेंगोलची स्थापना केलेली या लोकांना आवडली नाही.

PM Narendra Modi
4 State Assembly Election : लोकसभेसोबत चार राज्यांच्या निवडणुकांच्या तारखाही होणार जाहीर , कोणत्या राज्यांमध्ये होणार निवडणुका?

द्रमुक हा केवळ तामिळनाडूच्या भविष्याचा शत्रू नाही तर भूतकाळाचाही शत्रू आहे. काँग्रेसची इंडिया आघाडी तामिळनाडूचा विकास करू शकत नाही. या पक्षांचा घोटाळ्यांचा इतिहास आहे. जनतेला लुटण्यासाठी या पक्षांना सत्तेत यायचं असतं. एकीकडे भाजपच्या कल्याणकारी योजना आहेत, तर दुसरीकडे कोट्यवधींचे घोटाळे, असल्याचा दावाही त्यांनी केला.

तामिळनाडूच्या लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी इंडिया आघाडीतील पक्ष जबाबदार आहेत. मच्छीमार बांधवांना श्रीलंकेत फाशीची शिक्षा झाली होती. पण मोदी गप्प बसले नाहीत. मी सर्व मार्ग वापरला आणि सर्व प्रकारचा दबाव निर्माण केला आणि मी त्या सर्व मच्छिमारांना फाशी देऊन श्रीलंकेतून परत आणलं.

PM Narendra Modi
Bharat Jodo Nyay Yatra : 'न्यायासाठी लढायचं, संविधानाला टिकवायचं'; राहुल गांधी यांच्या शिवतीर्थावरील सभेचा टीझर रीलिज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com