4 State Assembly Election : लोकसभेसोबत चार राज्यांच्या निवडणुकांच्या तारखाही होणार जाहीर , कोणत्या राज्यांमध्ये होणार निवडणुका?

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसोबतच सिक्किम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्याही तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
4 State Assembly Election
4 State Assembly ElectionSaam Digital
Published On

4 State Assembly Election

लोकसभा निवडणुकांच्या तारखा शनिवारी म्हणजे उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. लोकसभा निवडणुकांसोबतच सिक्किम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्याही तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. लोकसभेचा कार्यकाळ १६ जूनला संपत आहे, त्याआधी निवडणुका पूर्ण होण्याची आवश्यकता आहे.

नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. सर्व विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षानेही त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. गेल्या वेळी 2019 मध्ये, सार्वत्रिक निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यांत पार पडल्या आणि 23 मे रोजी मतमोजणी झाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणूक 6 ते 7 टप्प्यात होऊ शकते. या कालावधीत आयोग राजकीय पक्षांना प्रचार आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 ते 32 दिवसांचा अवधी देण्यात येऊ शकतो. पहिल्या टप्प्यातील निवडणुका 18 किंवा 20 एप्रिलला होऊ शकतात. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल येऊ शकतात आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल.

4 State Assembly Election
Lok Sabha Election 2024 : व्हीके सिंह ते वरुण गांधींपर्यंत… उत्तर प्रदेशातील २५ जागांचा सस्पेन्स कायम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीत निवडणुका निष्पक्ष, शांततेत आणि योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी संवेदनशील भागात आणि राज्यांमध्ये किती फौजफाटा तैनात करायचा यावर चर्चा झाली. याशिवाय, किती टप्प्यांत निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, कोणत्या राज्यांमध्ये आधी निवडणुका घेता येतील आणि कोणत्या राज्यांच्या निवडणुका नंतर घेता येतील अशा विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली आहे. दोन्ही नवीन निवडणूक आयुक्तांनाही संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.

4 State Assembly Election
Bharat Jodo Nyay Yatra : 'न्यायासाठी लढायचं, संविधानाला टिकवायचं'; राहुल गांधी यांच्या शिवतीर्थावरील सभेचा टीझर रीलिज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com