Parliament Security Breach Saam TV
देश विदेश

Parliament Security Breach : लोकसभेत नेमकं काय घडलं? सभागृहातील घटनाक्रम महाराष्ट्राच्या खासदारांनी जसाच्या तसा सांगितला

Parliament Attack : संसदेत हा सगळा प्रकार घडत असताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने समोरच उभे होते. त्यावेळी नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती खासदार धर्यशील माने यांनी दिली.

प्रविण वाकचौरे

प्रमोद जगताप

New Delhi News Update :

संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. आजच्या दिवशी म्हणजेच १३ डिसेंबर रोजी २२ वर्षांपूर्वी संसदेवर दहशतवादी हल्ल्या झाला होता. आजच्याच दिवशी नव्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. लोकसभेत कामकाज सुरू असतानाच दोन अज्ञात व्यक्तीने प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात प्रवेश केला. यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ होऊन कामकाज तहकूब करण्यात आले.

संसदेत हा सगळा प्रकार घडत असताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने समोरच उभे होते. त्यावेळी नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती खासदार धर्यशील माने यांनी दिली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धैर्यशील माने यांनी म्हटलं की, घटना घडली तेव्हा मी तिथेच होतो. घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. आज संसदेवरील हल्ल्याला २२ वर्ष पूर्ण झाले आणि त्याच दिवशी ही घटना घडली. ते तरुण माझ्या समोर प्रेक्षक गॅलरीत बसले होते. मीही तिथच होतो.

सभागृहात हे एवढं अचानक घडल की काहीच समजलं नाही. पण सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. आता अजून सुरक्षा वाढवणे गरजेचं आहे. पास बंद करावेत की नाही हे लगेच बोलणे योग्य नाही, मात्र आणखी खोल तपासणी व्हावी, अशी मागणी धैर्यशील माने यांनी केली आहे. (Latest News)

संसद पाहायला मिळावी यासाठी पास दिला जातो. तिथे येणारे प्रेक्षक सगळेच ओळखीचे असतात असं नाही. पण पोलीस चौकशी करत आहेत, सगळं समोर येईल, असं देखील धैर्यशील माने यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT