देवेंद्र फडणवीस आजपासून 3 दिवस गोव्यात, तर उद्या अमित शहा यांच्या भरगच्च कार्यक्रम   अनिल पाटील
देश विदेश

देवेंद्र फडणवीस आजपासून 3 दिवस गोव्यात, तर उद्या अमित शहा यांचा भरगच्च कार्यक्रम  

मार्गदर्शन आणि भेटीगाठीवर भर

अनिल पाटील

गोवा : गोव्यात विधानसभा निवडणुकीचे वारे आता जोरात वाहत असून सत्ताधारी भाजपने ही निवडणूक जास्तच प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणी पक्षाचे निवडणूक प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासुन 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. तर उद्या गृहमंत्री अमित शहा यांच्या भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला असून आमदार, मंत्री यांना मार्गदर्शन आणि भेटीगाठीवर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. 

हे देखील पहा-

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपने आघाडी घेतली आहे. अन्य पक्षांनीही जोर धरून लावला आहे. भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांचा उद्या १४ ऑक्टोबर रोजी दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन आखण्यात आले आहे. यांच्या नियोजनासाठी आणि इतर निवडणुक मोर्चेबांधणीसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आज गोव्यात येत आहेत. गृहमंत्री अमित शहा उद्या सकाळी गोव्यात येणार आहेत. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष त्यांचे विमानतळावर स्वागत करणार आहेत.

दुपारी १ वाजेच्या सुमारास धारबांदोडा येथील फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाचे भूमिपूजन करणार आहेत. नंतर २ वाजता ते फोंड्याजवळच्या कुर्टी या ठिकाणी याच विद्यापीठाच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. पुढे ३ वाजता  ताळगाव कम्युनिटी हॉलमध्ये ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. यानंतर संध्याकाळी खाजगी हॉटेलमध्ये पक्षाचे विधीमंडळात आमदार, मंत्री त्यांच्याशी बैठक होणार आहे. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा करून, मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पक्षातील काही नाराज आमदार, मंत्री यांच्याशी ते वन- टू- वन भेटणार असून पक्षातील संभाव्य फूट टाळण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

SCROLL FOR NEXT