Gati Shakti Yojana: पंतप्रधान लॉन्च करत असलेली गती शक्ती योजना नेमकी काय?

आर्थिक क्षेत्रांकरिता महत्वाच्या असणाऱ्या प्रधानमंत्री गति शक्ति राष्ट्रीय मास्टर योजनेची सुरुवात करणार
Gati Shakti Yojana: पंतप्रधान लॉन्च करत असलेली गती शक्ती योजना नेमकी काय?
Gati Shakti Yojana: पंतप्रधान लॉन्च करत असलेली गती शक्ती योजना नेमकी काय?Saam Tv
Published On

वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi आज आर्थिक क्षेत्रांकरिता महत्वाच्या असणाऱ्या प्रधानमंत्री गति शक्ति राष्ट्रीय मास्टर योजनेची Gati Shakti scheme सुरुवात करणार आहेत. हा प्लान रेलवे, रस्त्याबरोबरच अन्य १६ मंत्रालयांना जोडणारा एक डिजिटल मंच तयार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट या दिवशी संबोधित करताना या योजनेविषयी घोषणा करण्यात आली होती. त्यांनी सांगितले होते की, गती शक्ति योजना लवकरच लॉन्च केलं जाणार आहे. ही योजना १०० लाख कोटी रुपयांपेक्षा देखील अधिक मोठी योजना असणार आहे. यामध्ये लाखो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. ही योजना देशाचा मास्टर प्लान बनणार आहे. जो इंफ्रास्ट्रक्चरचा पाया असणार आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होत.

हे देखील पहा-

गती शक्ती योजना नेमकी काय?

प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले होते की, भारत देशात पुढील काळात गतिशक्ती योजनेसाठी एक राष्ट्रीय मास्टर प्लान देशासमोर ठेवला जाणार आहे. १०० लाख कोटींपेक्षा जास्त किमतीची ही योजना असणार आहे. या योजनेच्या अंतर्गत लाखो लोकांनच्या हाताला रोजगार मिळणार आहे. हा पूर्ण देशासाठी मास्टर प्लान असणार आहे, जो प्लान देशात हॉलिस्टिक इंफ्रास्ट्रक्चरचा पाया रचणार आहे. सध्या दळणवळणाच्या साधनात कोणतीही ताळमेळ नाही, ही योजना यावर देखील काम करणार आहे.

Gati Shakti Yojana: पंतप्रधान लॉन्च करत असलेली गती शक्ती योजना नेमकी काय?
Mumbai मध्ये जळीतकांड, पार्किंगमधील 25 ते 30 दुचाकी अज्ञातांनी जाळल्या... (पहा व्हिडिओ)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार की, या योजनेचा मुख्य उद्देश विविध प्रकल्पांना संपर्काच्या माध्यमात मजबूती देण्याचा आणि एकीकृत करण्यासह समन्वय करण्याचा राहणार आहे. १६ मंत्रालयं आणि विभागांनी त्या सर्व प्रकल्पांना जीआयएस मोडमध्ये टाकले जाणार आहे. ज्या प्रकल्पांना २०२४- २५ पर्यंत पूर्ण करायचे आहे. ‘गति शक्ति' आपल्या देशासाठीचा एक सर्वात मोठा मास्टर प्लान असणार आहे.

जो पायाभूत सुविधा मजबूत करण्याकरिता मदत करणार आहे. सध्या आपल्या दळणवळण साधनांमध्ये समन्वय नाही, या योजनेमुळे अशा प्रकारच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. हा मंच उद्योगांची कार्यक्षमता वाढवण्याकरिता देखील अत्यंत महत्वाचा पाया ठरणार आहे. भविष्यात आर्थिक क्षेत्रांच्या निर्मितीकरिता नवीन संधी विकसित करण्यास देखील याची मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. माहिती सूचना प्रसारण मंत्रालयाने भास्कराचार्य राष्ट्रीय अंतराळ अनुप्रयोग आणि भू-सूचना विज्ञान संस्था यांनी हा मंच विकसित करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com