Uttar Pradesh Accident : 
देश विदेश

Accident : मध्यरात्री घडला काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, महामार्गावर ४ जणांचा जागीच अंत, २० जखमी

Uttar Pradesh Accident : उत्तर प्रदेशातील बागपत येथे ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेवर मध्यरात्री भीषण अपघात झाला. भाविकांच्या वाहनाला कॅन्टरने धडक दिल्याने वाहन उलटले. ४ जणांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले.

Namdeo Kumbhar

Baghpat Eastern Peripheral Expressway accident news : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये रविवारी मध्यरात्री भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. राजस्थानहून बदायूंला परतणाऱ्या भाविकांची एक खासगी बस 'ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे'वर अचानक रस्त्याच्या डिवाइडरला धडकली आणि पलटी झाली. या अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये सुमारे ३२ प्रवासी सवार होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

रविवारी रात्री १:४५ वाजता बागड धामहून परतणाऱ्या भाविकांनी भरलेली एक पिकअप कॅन्टरला जोरात धडकली आणि डिव्हायडरला लागून उलटली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तप २० भाविक जखमी झाले आहेत. हे सर्व बदाऊनचे रहिवासी आहेत. अपघातानंतर महामार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बदाऊनमधील अलहापूर गावातील लोक राजस्थानमधील बागड येथे तीर्थयात्रेला गेले होते. रात्री परत येत असताना ईपीईवरील बारागावजवळ एका कॅन्टरने पिकअपला धडक दिली, ज्यामुळे पिकअप डिव्हायडरला धडकून उलटली. बहुतेक लोक त्याखाली अडकले होते आणि आरडाओरडा सुरू होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या मदतीने त्यांनी लोकांना बाहेर काढले. पण तोपर्यंत एका मुलीसह चार जणांचा मृत्यू झाला होता. जखमींना सीएचसी खेकरा आणि जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

या अपघातात २० जण जखमी आहेत. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यातील काही गंभीर जखमींना दिल्ली आणि मेरठ येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच, जिल्हाधिकारी अस्मिता लाल आणि पोलीस अधीक्षक सूरज कुमार राय यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात हजेरी लावली. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना सर्वोत्तम उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अमरावती दौऱ्यावर

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 3 वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या दिग्गजानं १० वर्षांनी दिला तडकाफडकी राजीनामा

Jelly Bangles Designs: जुन्या बांगड्यांना म्हणा अलविदा, यंदाच्या फेस्टिव्हलला ट्राय करा या स्टायलिश जेली बँगल्स

Party Wear Blouse: पार्टी वेअर साडीला मिळेल खास लूक! ब्लाउज हे 7 फॅन्सी डिझाइन्स नक्की ट्राय करा

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

SCROLL FOR NEXT