Insurgency
Insurgency PTI
देश विदेश

देशातील या भागात सर्वाधिक अतिरेक्यांचा खात्मा; MHA अहवालातून समोर

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने (MHA) आपल्या वार्षिक अहवालात (2020-21) ईशान्येतील अतिरेकी आणि नागरिकांच्या मृत्यूबाबत अनेक महत्त्वाची माहिती आणि आकडेवारी जाहीर केली आहे. या वार्षिक अहवालात गेल्या 8 वर्षांत ईशान्येकडील राज्यांमध्ये (states) बंडखोरीच्या घटनांमध्ये 80 टक्क्यांनी घट झाल्याचे सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, 2014 पासून ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरक्षा स्थितीत बरीच सुधारणा झाली आहे.

सन 2020 मध्ये, गेल्या दोन दशकांमध्ये, बंडखोरीची सर्वात कमी प्रकरणे, नागरिक आणि सुरक्षा दलाच्या जवानांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 2014 च्या तुलनेत 2020 मध्ये दहशतवादाच्या (Terrorism) घटनांमध्ये 80 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. या कालावधीत, सुरक्षा दलाच्या जवानांच्या मृत्यूमध्ये 75 टक्के आणि त्या राज्यातील नागरिकांच्या मृत्यूमध्ये 99 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

हे देखील पहा-

2020 मध्ये अतिरेकी

या अहवालानुसार, 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये अतिरेक्यांच्या (Terrorist) घटनांमध्ये सुमारे 27 टक्के घट झाली आहे. 2019 मध्ये अशा 223 तर 2020 मध्ये अशा 162 घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे, नागरिक आणि सुरक्षा जवानांच्या मृत्यूमध्ये सुमारे 72 टक्के घट झाली आहे. 2019 मध्ये अशी 25 तर 2020 मध्ये अशी 7 प्रकरणे समोर आली आहेत.

2020 मध्ये ऑपरेशन्स

या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी करण्यात आलेल्या दहशतवादीविरोधी कारवायांमध्ये 21 बंडखोर मारले गेल्याचे अहवालात म्हटले आहे. यावेळी 646 बंडखोरांना अटक करण्यात आली. 2020 मध्ये ईशान्येकडील राज्यांतील विविध भागांतून 305 शस्त्रेही जप्त करण्यात आली होती. 2020 मध्ये ईशान्येकडील राज्यांतील बंडखोर गटांच्या किमान 2644 सदस्यांनी आत्मसमर्पण केले आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत.

राज्यांची स्थिती सुधारणे

या अहवालात म्हटले आहे की 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशात दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात 42 टक्के, आसाममध्ये 12 टक्के, मणिपूरमध्ये 23 टक्के आणि नागालँडमध्ये 45 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis On Opposition | देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

Shantigiri Maharaj | नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरल्यानं दिवसभर चर्चा, शांतीगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?, Exclusive Video

Tamannaah Bhatia : फॅन्सी साडीत तमन्नाच्या सौंदर्याची चर्चा, फोटो तुफान व्हायरल

Today's Marathi News Live : पीएम मोदींची पुण्यात सभा, चारही उमेदवार राहणार उपस्थित

Pune Accident News | पुण्यात लोखंडी रोल कोसळून अपघात

SCROLL FOR NEXT