Shraddha Walker case Saam TV
देश विदेश

Shraddha Walker case : २३ दिवस चौकशी करूनही पोलिसांचे हात रिकामे; अफताब विरोधात अद्याप ठोस पुरावा नाही

शरीराचे ३५ तुकडे केल्यावर त्याने यासाठी वापरलेले हत्यार देखील नष्ट केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shraddha Walker case : श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर गेल्या २३ दिवसांपासून मारेकरी अफताब पुनावाला पोलिसांच्या ताब्यात आहे. सध्या त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणी रात्रंदिवस शोध घेत आहेत. मात्र अद्यापही पोलिसांना अफताबच्या विरोधात ठोस असा पुरावा मिळालेला नाही. अफताबने या प्रकरणात सर्व पुरावे मोठ्या सफाईने नष्ट केले आहेत. त्यामुळे पोलिसांना अजूनही ठोस पुरावे मिळाले नाहीत.

संपूर्ण देशाला हादवून टाकणारी ही घटना १८ मे २०२२ रोजी घडली. अफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर क्रूरतेचा कळस गाठला. त्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केलेत याची कुणालाच खबर नव्हती. आपण या प्रकरणात पकडले गेल्यावर कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्याने मोठा सापळा रचला. या सापळ्यात पोलीस देखील गुरफटत आहेत. अनेक ठिकाणी आणि वेगवेगळ्या अॅंगलने पोलिसांचा तपास सुरु आहे. श्रद्धाची हत्या केल्यावर अफताब बरेच दिवस मोकाट फिरत होता. १२ नोव्हेंबर रोजी श्रद्धाच्या घरच्यांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे समोर आले.

अफताबच्या अटकेनंतर त्याची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली. तसेच दोन वेळा नार्को टेस्ट देखील झाली. यात त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या टेस्टमधून सत्य समोर येईल आणि ठोस पुरावे मिळतील अशी पोलिसांना आशा होती. मात्र ४ डिसेंबर रोजी नार्कोटेस्टचे रिपोर्ट आल्यावर तसे काहीच झाले नाही. या रिपोर्टमध्ये अफताबला कठोर शिक्षेसाठी तितके ठोस पुरावे मिळाले नाहीत.

अफताब आता देखील कारागृहात बुद्धिबळ (Chess) खेळात मग्न होत असल्याचे म्हटले जात आहे.त्याने पोलीस जसजसे तपास करतील तसतसे त्यांच्या मार्गात आणखीन नवे अडथळे आखून ठेवल्याचे म्हटले जात आहे. कारण यामुळेच एवढी चौकशी आणि चाचण्या करूनही पोलिसांचे हात रिकामे राहिले आहेत.

या प्रकरणात अद्याप श्रद्धाचे शिर पोलिसांना सापडलेले नाही. तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्यावर त्याने यासाठी वापरलेले हत्यार देखील नष्ट केले आहे. पोलीस अजूनही तिचे शिर शोधत आहेत. यासाठी पोलिसांनी श्रद्धाचा फोन देखील शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अफताबने तिचा फोन मुंबईतील समुद्रात फेकल्याचे म्हटले जात आहे. जर हे खरं असेल तर पोलिसांना तिचा फोन कधीच सापडू शकणार नाही. अफताबने जेव्हा श्रद्धाची हत्या केली तेव्हा त्याने घातलेले कपडे देखील मोठ्या डंपीग ग्राउंडमध्ये फेकले.

यात डोक्याला आणखीन ताण देणारी बाब म्हणजे जेव्हा अफताबला नार्को टेस्टविषयी विचारण्यात आले तेव्हा तो जराही घाबरला नाही. या टेस्टमधून आपल्या तोंडून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होईल याची त्याला कल्पना होती. तरी देखील तो या चाचणीसाठी मागे हटला नाही. त्याचा आत्मविश्वास पाहून पोलीस देखील थक्क झाले. शेवटी यातही पोलिसांना (Police) ठोस माहिती मिळालेली नाही.

श्रद्धाचा तपास करताना पोलीस आपल्या घरापासूनच सुरूवात करणार याची अफताबला खात्री होती. त्यामुळे त्याने घरात एकही पुरावा ठेवला नाही. त्याने भिंतीवर लागलेले रक्ताचे सर्व डाग नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने गूगलवर रक्ताचे डाग मिटवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या. पोलिसांनी देखील त्याच्या घरात तपास केल्यावर रक्ताचे डाग शोधण्यासाठी त्यांना मशीनचा वापर करावा लागला. त्यामुळे त्यांना बाथरूममध्ये रक्ताचे काही डाग आढले. आता हे रक्त श्रद्धाचेच आहे की नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी श्रद्धाचे वडील आणि भावाचे डीएनए सॅम्पल जुळवून पाहिले जाणाआर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandalachi kheer: दसऱ्याला बनवा काहीतरी गोडधोड,तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: प्रांजल खेवलकर येरवडा कारागृहातून बाहेर

Gold Price: आठवडाभरात सोनं ८००० रुपयांनी वाढले, २०२४ मध्ये दसऱ्याला सोन्याची दर किती होते?

Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

SCROLL FOR NEXT