Crime News: श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; गोळ्या झाडून मृतदेहावर पेट्रोल ओतले; नंतर २०० किमी दूरवरील जंगलात फेकले

श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती छत्तीसगडमध्ये झाली आहे. प्रियकरानेच प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचे उघड झाले आहे.
Crime News
Crime News Saam TV
Published On

Crime News: श्रद्धा वालकरच्या हत्येने संपूर्ण देश हादरून गेला असतानाच, अशीच एक घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगडमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. त्यापूर्वी ओळख पटू नये यासाठी त्याने मृतदेहावर पेट्रोल ओतले. रायपूरपासून २०० किलोमीटर दूर असलेल्या ओडिशा येथील जंगलात त्याने मृतदेह फेकून दिला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ती आणखी एका मुलाला डेट करत असल्याचा संशय तिच्या प्रियकराला होता. यातूनच त्याने तिची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

मिळालेल्या महितीनुसार, मृत मुलीचे नाव तनू कुर्रे असे आहे. ती कोरबा येथील रहिवासी असून कामानिमित्त रायपूरला आली होती. एका बँकेत (Bank) नोकरी करत असताना बालंगीर येथील व्यवसायिक सचिन अग्रवालबरोबर तिची ओळख झाली. दोघांमध्ये हळूहळू घट्ट मैत्री झाली आणि पुढे हिच मैत्री (Friendship) प्रेमात बदलली गेली. अशात ते दोघे रायपूर येथेच एकत्र राहत होते. २१ नोव्हेंबर रोजी तनूचे कुटुंबीय तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा काहीच संपर्क होत नसल्याने ते थेट तनूच्या घरी पोहचले. मात्र तिथे देखील ती नसल्याने कुटुंबीयांनी ती हरवली असल्याची तक्रार नोंदवली.

स्वत:च्या बचावासाठी तनू जिवंत असल्याचा दिला पुरावा

सचिनने तनूवर गोळ्या झाडून तिची हत्या केली होती. तसेच तिचा फोन त्याने स्वत:कडे ठेवला आणि ओडिसा येथील जंगलात तिचा मृतदेह फेकून दिला. तिची ओळख पटू नये यासाठी त्याने मृतदेहावर पेट्रोल टाकले होते. तसेच तनूच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी त्याने तिच्या फोनवरून आपण लवकरच लग्न करू, असा मेसेज स्वत:ला केला आणि ती जिवंत असल्याचे तो वारंवार सांगत राहिला.

Crime News
Cyber Crime: मेडीकल कोर्सला प्रवेश देण्याची बतावणी; 15 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक

अशात ओडिशा पोलिसांना तिचा मृतदेह आढळल्यावर त्यांनी रायपूरच्या पांद्री पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. मृतदेह तनूचा असल्याचे समजल्यावर पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर त्यानेच तनूची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

Crime News
Crime News: खळबळजनक! वर्चुअल रियालिटी हेडसेट देत नसल्याने १० वर्षीय मुलाने आईची केली हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान सचिनने अनेक वेळा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्याने गुन्हा कबूल करत हत्येचे कारण देखील सांगितले. फिरायला जाण्याचे कारण सांगून त्याने तनूला ओडिशाला आणले होते. मात्र ती आणखीन एका मुलाला डेट करत होती. त्यामुळे त्याने तिची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com