Tihar Jail: तिहार कारागृहात अफताबला मिळतात या सुविधा; या निकषांवर ठरतो कैद्याचा बॅरेक क्रमांक

बॅरक क्रमांक -४ मध्ये ज्यांचे नाव Aआणि R या अक्षरांनी सुरु होते ते कैदी असाता.
Tihar Jail
Tihar JailSaam TV
Published On

Tihar Jail: श्रद्धा वालकरचा मारेकरी अफताब अमीन पुनावाला सध्या तिहार जेलमध्ये आहे. त्याला बॅरेक क्रमांक-४ मध्ये ठेवण्यात आले आहे. अशात तो या जेलमध्ये तासंतास बुद्धिबळ खेळतो. तसेच त्याच्या विनंतीनंतर जेलमध्ये त्याला पॉल थेरॉक्सचे 'द ग्रेट रेल्वे बाजार' हे पुस्तक उपलब्ध करून दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. अशात अफताबला मिळणाऱ्या सुविधा पाहता तिहार जेलमध्ये कैद्यांना नेमकी कशी वागणूक दिली जाते? त्यांना कोणत्या बॅरेकमध्ये ठेवायचे हे कसे ठरवतात? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहेत. त्यामुळे आज याच सर्वांविषयी सोप्या शब्दात माहिती जाणून घेऊ.

असा ठरतो कैद्याचा बॅरेक क्रमांक

  1. तिहार जेलमध्ये प्रत्येक कैद्याच नाव, गुन्हा, त्याचे वय, लिंग अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन त्याचा बॅरक क्रमांक निश्चित केला जातो. बॅरक क्रमांक - १ मध्ये Sआणि Y या अक्षराने ज्यांचे नाव सुरु होते ते कैदी असतात.

  2. बॅरक क्रमांक -२ मध्ये १० वर्षांहून अधिक काळासाठी शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना ठेवले जाते.

  3. बॅरक क्रमांक -३ मध्ये B,V,C,D,E,Fआणि G या अक्षरांनी ज्यांचे नाव सुरु ते कैदी ठेवले जातात.

  4. बॅरक क्रमांक -४ मध्ये ज्यांचे नाव Aआणि R या अक्षरांनी सुरु होते ते कैदी असाता. अफताबला याच बॅरकमध्ये ठेवण्यात आले आहे.

  5. बॅरक क्रमांक -५ मध्ये १० वर्षांपेक्षा कमी शिक्षा असेल्या कैद्यांना ठेवले जाते.

  6. बॅरक क्रमांक -७ मध्ये महिला कैद्यांना ठेवले जाते.

कारागृहात किती कैदी राहू शकतात?

तिहारमध्ये ९ मध्यवर्ती कारागृहे (Jail) आहेत. तसेच उर्वरित मध्यवर्ती कारागृह रोहिणी आणि मंडोली येथे आहेत. एकूण १६ मध्यवर्ती कारागृहांच्या क्षमतेनुसार यात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याचे एका सर्वेक्षणात समजले आहे. साल २०१९ रोजी संपूर्ण कारागृहाची क्षमता १००२६ कैद्यांची होती. मात्र त्यावेळी १७५३४ एवढे कैदी ठेवण्यात आले होते. एकंदर क्षमतेच्या चौपट कैदी कारागृहात ठेवले जात आहेत. यामध्ये अंडरट्रायल कैद्यांची संख्या जास्त असल्याचे म्हटले जाते.

Tihar Jail
Shraddha Walker Murder Case : चिनी चॉपरने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे, मोबाईल समुद्रात फेकला... आफताबचा नवा खुलासा

कैद्यांना अहेत या सुविधा

कैद्यांच्या (Prisoner)आरोग्याची काळजी घेण्यासाठी कारागृहात १२० खाटांचे रुग्णालय आहे. यात आपातकालीन परिस्थितीसाठी देखील विशेष सुविधा उपलब्ध आहे. तसेच १०० डॉक्टर आणि ७१ नर्सिंग स्टाफ कैद्यांची काळजी घेण्यासठी आहेत. प्रत्येक कैद्याला बाहेरील व्यक्ती भेटण्यास येऊ शकतात. यासाठी प्रत्येका वेगवेगळी वेळ निश्चित केली जाते. या वेळेत कैदी त्यांच्या नातेवाईकांना भेटू शकतात. कैद्यांच्या आहाराची देखील येथे विशेष काळजी घेण्यात येते. स्वच्छ आणि पौष्टिक आहार दिला जातो. तसेच मोफत कायदेशीर माहिती, न्यायालयाच्या कामकाजाची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स, शिक्षण अशा सुविधा कैद्यांना पुरवल्या जातात. यात कैद्यांच्या सुरक्षिततेवर जास्त लक्ष दिले जाते.

Tihar Jail
Aftab Poonawala Narco Test : श्रद्धाचं शिर कुठे फेकलं? आफताबनं नार्को चाचणीवेळी दिलं चक्रावणारं उत्तर

तिहार जेल विषयी अधिक माहिती

तिहार कारागृह हे जगभरातील सर्वात मोठे कारागृह आहे. दक्षिण आशियातील सर्वात मोठे कारागृह म्हणून तिहार कारागृहाची ओळख आहे. हे कारागृह सुमारे ४०० एकर क्षेत्रफळात विस्तारले आहे. यात टेलरींग, बूट बनवणे, जेवण, कागद, भांडी असे काही व्यवसाय सुरु असल्याचे म्हटले जाते. दिल्लीमध्ये मंडोली, रोहिणी आणि तिहार येथे तीन महत्वाचे कारागृह आहेत. यातील तिहारमध्ये ९ मध्यवर्ती कारागृह आहेत. तसेच रोहिणी आणि मंडोलीमध्ये उर्वरित कारागृह आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com