
Shraddha Walker Case - Aftab Poonawala Narco Test : दिल्लीच्या महरौली परिसरात श्रद्धा वालकर हिची हत्या झाली. या प्रकरणातील संशयित आरोपी आफताब पूनावाला याची आज, गुरुवारी नार्को चाचणी करण्यात आली. दोन तास सुरू असलेल्या सखोल चौकशीत आफताबनं अनेक धक्कादायक खुलासे केले. नार्को चाचणीवेळी श्रद्धाचा फोन कुठे आहे असं त्याला विचारलं. त्यावर श्रद्धाचा फोन फेकून दिल्याचं आफताबनं सांगितलं. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर केल्याचीही त्यानं कबुली दिली.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी कुणी सामील आहे का? असा प्रश्न यावेळी आफताबला विचारण्यात आला. त्यावर ही हत्या त्यानेच केल्याची कबुली दिली. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जंगलात फेकल्याचीही कबुली त्यानं दिली. ज्यावेळी श्रद्धाचे शिर कुठे फेकले याबाबत प्रश्न विचारला असता, त्यावर पोलिसांना चक्रावून टाकणारं उत्तर त्यानं दिलं. याबाबतीत आधीच पोलिसांना सांगितलं आहे, असं आफताब म्हणाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. (Shraddha Walker)
दिल्लीतील रोहिणी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आफताबला आज सकाळी आठ वाजून ४० मिनिटांनी नेण्यात आलं. तिथं त्याची नार्को चाचणी जवळपास १० वाजता सुरू झाली. त्याला तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सूत्रांना सांगितले की, नार्को चाचणीआधी आफताबची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (Delhi Police)
आफताबवर श्रद्धाच्या हत्येचा आरोप
मुंबईजवळील वसई येथील श्रद्धा वालकर हिची दिल्लीतील महरौली भागात हत्या झाली. तिचा लिव्ह - इन पार्टनर आफताब पूनावाला यानं श्रद्धाची हत्या केल्याचा आरोप आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. दक्षिण दिल्लीच्या महरौली येथील फ्लॅटमध्ये जवळपास तीन आठवडे त्याने ते तुकडे ३०० लीटर क्षमतेच्या एका फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर अनेक दिवस तो ते तुकडे वेगवेगळ्या परिसरात फेकत होता. पोलिसांनी १२ नोव्हेंबरला आफताबला अटक केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.