
Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांना (Police) महत्त्वाची माहिती मिळाली आहे. काल त्याची नार्को टेस्ट झाली. त्याच्याकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी जे शस्त्र वापरले होते ते शस्त्र पोलिसांना सापडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, आफताबने श्रद्धाच्या शरीराचे चिनी चॉपरने तुकडे केले होते. नार्को टेस्टदरम्यान आफताबने ते चॉपर कुठं टाकलं त्याबद्दल माहिती दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने आधी श्रद्धाच्या हाताचे तुकडे केले होते. पोलीस आता त्या ठिकाणी जाणून त्या चॉपरचा शोध घेत आहेत. गुरुग्राम येथील त्याच्या कार्यालयासमोर झाडीत ते हत्यार फेकून दिलं. शिवाय श्रद्धाचं शीर महरौलीच्या जंगलात फेकल्याचं त्यांने सांगितलं.
आफताबने हे चॉपर कोठून आणले होते, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. याशिवाय हे चॉपर18 मे पूर्वी खरेदी केली होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या हत्येनंतर अल्फताबने अनेक महिने श्रद्धाचा मोबाईल फोन जवळ ठेवला होता. मुंबई पोलिसांनी आफताबला चौकशीसाठी बोलावले तेव्हा श्रद्धाचा मोबाईल फोन त्याच्याकडेच होता, नंतर त्याने तो फोन मुंबईतील समुद्रात फेकून दिला.
आफताब तुरुंगात एकटाच बुद्धिबळ खेळतो
श्रद्धा खून प्रकरणात आफताबला पोलिसांकडून अनेक तास चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्याची पॉलीग्राफी झाली आणि नंतर नार्को टेस्ट. प्रत्येक वेळी त्याने हुशारीने उत्तरे दिली. आतापर्यंतच्या तपासात त्याच्याकडून काही नवीन माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. चौकशीदरम्यान तो नेहमी शांत दिसला.
आता त्याच्या छंदाशी संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. त्याला बुद्धिबळ हा खेळ खूप आवडतो, असे कळते. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅरेक क्रमांक-4 मध्ये बंद असलेला आफताब वेळ घालवण्यासाठी तासन्तास बुद्धिबळ खेळतो. तो त्याच्या बॅरेकमध्ये एकटाच बुद्धिबळाचा पट लावतो.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.