उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक दुसऱ्यांदा विमान अपघातातून बचावले
उपमुख्यमंत्र्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड
विमानाच्या इंजिनमधून धूर येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांची धावाधाव
उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक हे सोमवारी एका विमान अपघातातून थोडक्यात बचावले. उपमुख्यमंत्री पाठक हे मुरादाबादहून लखनौला निघाले होते. त्यांच्या ६ सीटर असलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडानंतर काही मिनिटांसाठी विमानतळावर एकच खळबळ उडाली.
नेमकं काय घडलं?
सरकारी विमान धावपट्टीवर उड्डाणासाठी सज्ज झालं होतं. मात्र, काही मिनिटांत विमानाचं इंजिन अचानक बंद झालं.त्यानंतर अचानक इंजिनमधून धूर यायला सुरुवात झाली. इंजिनमधून धूर येऊ लागताच पायलट आणि ग्राऊंड स्टाफमध्ये खळबळ उडाली.
विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी क्षणाचाही विलंब न करता विमानाजवळ पोहोचले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यासहित क्रू मेंबर्सला सुरक्षितरित्या विमानातून बाहेर काढलं. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक हे रस्ते मार्गाने लखनौला रवाना झाले. तांत्रिक बिघाड झालेल्या विमानातील सर्व सुरक्षित आहेत. पायलट आणि क्रू मेंबर्स देखील सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मे महिन्यात दुसर्यांदा धोका टळला
उपमुख्यमंत्री हे दुसऱ्यांदा विमान दुर्घटनेतून बचावले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीहून लखनौला उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांचं विमान वादळात अडकलं होतं.
खराब हवामानामुळे पायलटला विमानाला भोपाळच्या दिशनेने वळवां लागलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री हे लखनौतील नियोजित कार्यक्रमास काही तास उशीरा पोहोचले.
तत्पूर्वी, या घटनेनंतर मुरादाबाद विमानतळाने नागरी विमान वाहतूक विभागाला तांत्रिक बिघाड तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर इंजिनीअरचं पथक विमानात नेमकं काय तांत्रिक बिघाड झाला, याचा तपास करत आहे. विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे हवाई वाहतुकीच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.