नवी दिल्ली: देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव थोडाफार प्रमाणात कमी होताना दिसून येत आहे. मात्र, कोरोनानंतर देशात नवीन संकट येण्याची शक्यता आहे. कारण, देशातील काही राज्यांमध्ये डेंग्यूचा (Dengue) उद्रेक होताना दिसत आहे. दरम्यान, डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तज्ज्ञांची केंद्रीय पथके पाठवली आहेत. डेंग्यूच्या प्रादुर्भावाभा विषयी तांत्रिक माहिती देण्यासाठी आरोग्य पथकं पोहोचली आहेत.
हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाकडून तज्ज्ञांची पथके पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पथकांमध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि मच्छर-जनित रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सेवा महासंचालक आणि प्रधान सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे.
डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देऊन राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्रीय पथके तैनात करण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे, असे पत्रात म्हटले आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा सामना कशा पद्धतीने करावा यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रिय पथकं राज्यांत जाणार आहेत आणि राज्य सरकारांना मदत करणार आहेत असे पत्रात म्हटले आहे.
आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिवांना डेंग्यूचे जास्त रुग्ण असलेल्या राज्यांची नावं काढून पथक पाठवण्याचे आदेश दिले होते. आरोग्यमंत्र्यांनी या आजारावर नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीतील डेंग्यू परिस्थितीचा आढावा घेतला. या वर्षी आतापर्यंत दिल्लीत डेंग्यूचे 1,530 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ऑक्टोबरमध्ये सुमारे 1,200 प्रकरणे नोंदवली गेली. जी गेल्या चार वर्षांतील या महिन्यातील सर्वाधिक संख्या आहेत.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.