Delimitation Bill Saam Tv
देश विदेश

Delimitation Bill: मोठी बातमी! डिलिमिटेशन बिलावरून राजकीय घडामोडींना वेग, काँग्रेसकडून शरद पवार अन् एम.के स्टॅलिन यांची मनधरणी सुरू

Sonia Gandhi And Sharad Pawar: डिलिमिटेशन बिलावरून राज्यासह देशातील राजकारण तापले आहे. काँग्रेस नेत्यांकडून शरद पवार आणि एम.के स्टॅलिन यांची मनधरणी सुरू आहे.

Priya More

सोमवारी डिलिमिटेशन विधेयक संसदेत सादर केले जाणार आहे. यापूर्वी देशासह राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंडिया आघाडीचे नेते शरद पवार यांची भेट घेून समजूत काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या पडद्यामागून हालचाली वाढल्या आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी मुंबईत येणार आहेत. हे सर्वजण शरद पवार यांची भेट घेऊन डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा करणार आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते एम के स्टॅलिन आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मल्लिकार्जुन खरगे दुपारी २ वाजता स्टालिन आणि रात ८ वाजता ते पवारांना भेटणार आहेत. डिलिमिटेशन बिलाबाबत पवारांना भेटून सर्व नेते चर्चा करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोनिया गांधी यासुद्धा खरगे यांच्यासोबत पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. डिलिमिटेशन विधेयक संसदेत सादर होण्यापूर्वीची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आणि रेवंत रेड्डी हे एकाच विमानाने थोड्याच वेळात चेन्नईला रवाना होणार आहेत. तर शिवसेना ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत हे देखील आज संध्याकाळी शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसंच, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या सकाळी ९ वाजता दिल्लीत बैठक होणार आहे. मतदार संघ पुनर्रचना विधेयकासंदर्भात भूमिका ठरणार आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूने मतदान करायचं की विरोधात यावर दिल्लीत चर्चा होणार आहे.

दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात खासदारांची ही बैठक होईल. बाळ्या मामा म्हात्रे वगळता सर्व खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांची आज दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. दुपारी १२ वाजता बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीत संसदेच्या अधिवेशनाबाबत रणनीती ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shoes-socks Odour : हिवाळ्यात शूज काढताच येतो घाणेरडा वास? ट्राय करा 'या' ५ घरगुती ट्रिक्स, पाय राहतील मुलायम

Mumbai-Girgaon : गिरगावच्या नावामागे दडलाय शेकडो वर्षांचा इतिहास, तुम्हाला माहीत आहे का?

Gold Rate Today : आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ! 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव किती?

Maharashtra News Live Update: महिला आरक्षणावर निलम गोऱ्हेंचा काँग्रेसवर निशाणा; ‘पक्षात ५० टक्के आरक्षण का दिलं नाही?’

Winter Skin Care: थंडीत त्वचा खूपच कोरडी पडतेय? आंघोळीपूर्वी करा फक्त 'हे' काम, स्किन राहील मऊ अन् मुलायम

SCROLL FOR NEXT