Mumbai-Girgaon : गिरगावच्या नावामागे दडलाय शेकडो वर्षांचा इतिहास, तुम्हाला माहीत आहे का?

Shreya Maskar

मुंबई-गिरगाव

मुंबईतील गिरगाव हे नाव संस्कृतमधील ‘गिरी’ आणि ‘ग्राम’ या दोन शब्दांपासून पडल्याचे मानले जाते. डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव असा या नावाचा अर्थ होतो. या नावामागे गिरगावचा भौगोलिक आणि ऐतिहासिक वारसा दडलेला आहे.

Mumbai-Girgaon | pinterest

गिरगाव गावाचा अर्थ

‘गिरी’ म्हणजे डोंगर आणि ‘ग्राम’ म्हणजे गाव. या दोन संस्कृत शब्दांपासून ‘गिरिग्राम’ किंवा ‘गिरगाव’ हे नाव तयार झाल्याचे सांगितले जाते.

Meaning of Girgaon village | pinterest

गिरगाव लोकेशन

गिरगाव हे मुंबईतील मलबार हिलच्या पायथ्याशी वसलेले आहे. त्यामुळे या परिसराला डोंगराच्या पायथ्याचे गाव, असा अर्थ प्राप्त झाला.

Girgaon Location | pinterest

पूर्वीचे नाव

जुन्या नोंदींमध्ये या परिसराचा उल्लेख ‘गिरगाम’ अशा शब्दात आढळतो. कालांतराने ‘गिरगाव’ हे नाव रूढ झाले.

Girgaon | pinterest

शेती- वाड्यांचा परिसर

पूर्वी गिरगाव परिसरात शेती, बागा आणि नारळ-माडांची लागवड होती. त्यामुळे या भागात अनेक वाड्या विकसित झाल्या आणि त्यांच्या नावांमध्येही त्या काळातील जीवनशैलीचे प्रतिबिंब दिसते.

Agriculture- the area of mansions | pinterest

मुंबईच्या विस्तारासोबत बदललेले स्वरूप

१९व्या शतकात रस्त्यांचा विकास आणि वाहतुकीच्या सुविधा वाढल्यामुळे गिरगावमध्ये लोकवस्ती वाढू लागली. पुढे विविध समाजांचे लोक येथे स्थायिक झाले.

Mumbai | pinterest

गिरगावला कसं पोहचाल?

मुंबईतील गिरगाव परिसरात रेल्वे, बस, टॅक्सी किंवा खासगी वाहनाने सहज पोहोचता येते.पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड हे गिरगावसाठी जवळचे रेल्वे स्थानक आहे. येथून गिरगावच्या अनेक भागांत पायी किंवा टॅक्सीने जाता येते.

How to reach Girgaon? | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : भेंडीच्या भाजीवरून पडलंय का मुंबईतील 'भेंडी बाजाराचं' नाव? उत्तर वाचून धक्काच बसेल

Bhendi Bazaar | AI PHOTO
येथे क्लिक करा...