Delimitation Bill Gets Union Cabinet Approval Saam Tv
देश विदेश

Delimitation Bill: मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Delimitation Bill Gets Union Cabinet Approval: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतमध्ये डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेमध्ये ५० टक्के जागा वाढणार आहेत.

Priya More

डिलिमिटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत डिलिमिटेशन विधेयकाबाबत निर्णय घेण्यात आला. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेमध्ये ५० टक्के जागा वाढणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महिला आरक्षणाशी संबंधित एका दुरूस्तीलाही मंजुरी देण्यात आली आहे. लोकसभेचे अधिवेशन ३० नोव्हेंबर आणि राज्यसभेचे अधिवशेन २ डिसेंबर रोजी होणार आहे.

आज दुपारी २ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची अधिवशेनासंदर्भात महत्वाची बैठक झाली. तब्बल पाऊण तास ही बैठक झाली. या बैठकीमध्ये डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकासंदर्भात मोठा निर्णय घेतला जाईल असा अंदाज वर्तवला जात होता. हा अंदाज बऱ्यापैकी खरा ठरला. केंद्रीय मंत्रिमंडळाने डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी देण्यात आली. डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यानंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या ५० टक्के जागा वाढणार आहेत. लोकसभेतील जागा ५४३ वरून ८१५ होणार आहेत. या विधेयकाच्या मंजुरीमुळे महिला आरक्षण कायद्यात सुधारणा होईल.

डिलिमिटेशन विधेयकानुसार, २०२९ च्या निवडणुकांपूर्वी लोकसभेतील जागांची कमाल संख्या ८५० पर्यंत वाढवण्याचा आणि महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये बहुमताअभावी डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. आता भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर हे विधेयक मंजूर करण्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. आता कोणता पक्ष या विधेयकाला पाठिंबा देतेय हे पाहणे महत्वाचे राहिल.

Latur : १७ गावांना पाणीपुरवठा करणारं धरण कोरडंठाक; पाणीटंचाईचं भीषण संकट; पाहा साम टीव्हीचा ग्राउंड रिपोर्ट

Maharashtra News Live Update: अखेर अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस दराचा तिढा सुटला

कातील नजर आणि घायाळ अंदा, प्रियदर्शनीचे नऊवारी साडीतील फोटो पाहून झोप उडेल

Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलासाठी हालचालींना वेग, इकडे काँग्रेसची बैठक, तिकडे भाजप नेत्यांचा शरद पवारांना फोन, काय होणार?

EPFO UPI Withdrawal : PF चे पैसे काढण्यासाठी क्लेमची झंझट संपणार? डिसेंबरमध्ये येतेय नवी सुविधा

SCROLL FOR NEXT