Weather Update
Weather Update Saam tv
देश विदेश

Delhi Weather : दिल्ली-एनसीआरमध्ये 'फॉग अटॅक', धुक्यामुळे वाहनांच्या वेगाला ब्रेक; थंडीची लाट कायम

वृत्तसंस्था

Delhi Weather Update - देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) थंडीचा कडाका कायम आहे. दिल्ली-एनसीआर आज, 27 डिसेंबरला दाट धुक्याने ग्रासले आहे. धुक्यामुळे रस्त्यांवरील वाहनांचा वेग मंदावला आहे. तसेच पुढील 2 दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीसह उत्तर भारतातील बहुतांश राज्यात पुढील दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. थंडीमुळे दिल्ली-एनसीआर भागात दाट धुके पसरले आहे यामुळे रस्त्यांवरील वाहनांचा वेग मंदावला आहे. (Tajya News)

दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक पहाटे शेकोटीचा आधार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत किमान तापमान 6 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 17 अंश राहण्याचा अंदाज आहे. आजही दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये थंड वारे वाहत असल्याने किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

दिल्लीत आज तापमान किती असेल?

दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुके पसरले आहे. उत्तर भारतातील विविध राज्यांमध्ये धुक्यामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक गाड्याही त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा काही तास उशिराने धावत आहेत. मात्र, आजपर्यंत दिल्ली विमानतळावरील विमानांचे कामकाज सुरळीत सुरु आहे.

IMD च्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस दिल्लीत मध्यम धुके राहील. यासोबतच तापमानातही किंचित वाढ नोंदवली जाऊ शकते. 28 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत किमान तापमान 6 अंश आणि कमाल तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत असू शकते. त्याचवेळी, आयएमडीच्या अंदाजानुसार, नवीन वर्षात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi Sabha: मोठी बातमी! मोदींच्या सभेआधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीसा; पोलिसांकडून अनेकांची धरपकड

Madhuri Dixit Net Worth : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण! जाणून घ्या नेटवर्थबद्दल

Narendra Modi: PM मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात येणार, कल्याण अन् दिंडोरीत जंगी सभा घेणार; मुंबईत करणार रोड शो

Rain Alert : मुंबई, ठाण्यासह राज्यातील 'या' भागात कोसळणार तुफान पाऊस; IMD कडून अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Madhuri Dixit : माधुरीच्या सौंदर्याने 'हे' दिग्गज अभिनेते झाले होते घायाळ, मात्र ती पडली डॉक्टरांच्या प्रेमात

SCROLL FOR NEXT