Petrol Diesel Rate: वर्ष अखेरीस पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaam Tv

नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत क्रूडच्या किंमतीत सुमारे 1 डॉलरने वाढ झाली असून ब्रेंट क्रूड किंमत प्रति बॅरल 84 च्या जवळ पोहोचले आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहे. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. (Petrol Diesel Price Today)

Petrol Diesel Price
'राजीनामा घेऊच तोही व्याजासहित..,' राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं ट्विट; अब्दुल सत्तारांची खुर्ची जाणार?

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोल 64 पैशांनी महागले असून ते 108.12 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेल 60 पैशांनी वाढून 94.86 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. यूपीच्या गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) जिल्ह्यात आज पेट्रोल 34 पैशांनी स्वस्त झाले आहे आणि ते 96.58 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेल 33 पैशांनी स्वस्त होऊन 89.75 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अतिवेगामुळे टायर फुटले, कार चार वेळा उलटली

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com