Delhi Temperature News Saam TV
देश विदेश

Heat Wave Alert : दिल्लीकरांवर सूर्य कोपला, १४ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड तुटला; ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Delhi Temperature News : शुक्रवारी दिल्लीतील तापमानाने १४ वर्षांतील रेकॉर्ड मोडला आहे. उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा आणि प्रचंड उकाड्यामुळे दिल्लीकर हैराण झाले आहेत.

Satish Daud

उत्तर-पश्चिम भारतात सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. बहुतांश राज्यांमधील तापमान चाळीशीपार गेलं आहे. दिल्लीतही विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिल्लीतील तापमानाने १४ वर्षांतील रेकॉर्ड मोडला आहे. उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा आणि प्रचंड उकाड्यामुळे दिल्लीकर हैराण झाले आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १७) दिल्लीतील नजफगढमध्ये कमाल तापमान ४७.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. यंदाच्या वर्षातील हे सर्वाधिक तापमान आहे. हरियाणातील सिरसा येथेही तापमानाचा पारा ४७.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.

उत्तर प्रदेशातही तापमानात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी आग्रा हे सर्वाधिक उष्ण होते. जिथे कमाल तापमान ४६.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जम्मूमध्ये तापमान ४१.३ तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील उना, धरमशाला, शिमला आणि मनाली येथे शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

उना आणि हमीरपूरच्या नेरीमध्ये तापमानाचा पारा ४३ अंशावर गेला आहे. तर बिलासपूर आणि धौला कुआनमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील तीन दिवस दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.

श्चिम राजस्थानमध्ये २० मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे तापमानाचा पार वाढत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. IMD नुसार, पुढील ७ दिवसांत, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, लक्षद्वीप आणि दक्षिण भागात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे.

२१ मे पर्यंत तामिळनाडू-पुद्दुचेरी-कराईकल, केरळ-माहे, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शहापूर तालुक्यातील काही भागात वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाची दमदार हजेरी

Diwali Lucky Rashi: दिवाळीत 'या' राशींची होणार चांदी, खिशा पैशांनी भरणार

१८६ महागड्या कार खरेदी करत २१ कोटी रुपयांची बचत, गुजरातमध्ये जैन समाजाने लढवली अजब शक्कल; प्रकरण काय?

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

Gulab Jamun Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा? वाचा ही सिक्रेट रेसिपी

SCROLL FOR NEXT