देश विदेश

Crime News: दिल्ली हादरली! घरात घुसून ३ महिलांवर जीवघेणा हल्ला, एकीचा मृत्यू

Delhi Crime News: दिल्लीच्या ख्याला भागात एका व्यक्तीने घरात तीन महिलांवर चाकूने हल्ला केला. यात एकीचा मृत्यू झाला. उर्वरित दोन महिलांचा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dhanshri Shintre

दिल्लीतील ख्याला भागात आज सकाळी झालेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला. जेजे कॉलनीतील एका घरात एका व्यक्तीने तीन महिलांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ३९ वर्षीय नुसरत नावाच्या महिलेचा मृत्यू झाला असून, ४२ वर्षीय अकबरी आणि २० वर्षीय सानिया या दोन महिला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला सकाळी सुमारे आठ वाजून पाच मिनिटांच्या सुमारास झाला. पीसीआरला मिळालेल्या माहितीनंतर पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी नुसरत दुसऱ्या मजल्यावरील घरात मृतावस्थेत सापडली, तर इतर दोघी महिला रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत आढळल्या आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.

या प्रकरणात पोलिसांनी ४९ वर्षीय आरोपी इस्तेखार अहमद उर्फ बब्बू याला अटक केली आहे. १९ वर्षीय तक्रारदार उस्मानने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घरात शिरून महिलांवर चाकूने वार करत होता. हल्ल्यानंतर आरोपीला त्याच्याच कुटुंबियांनी रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

या घटनेमागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. तपास सुरू असून, आरोपीने महिलांवर असा हल्ला का केला यामागील कारण शोधले जात आहे. या अमानुष घटनेमुळे ख्याला परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT