How serial blast plan across 4 cities saam tv
देश विदेश

Delhi car blast : डॉक्टरांच्या दहशतवादी जाळ्यावर NIA चा छापा, सहा राज्यांमध्ये तपास, धक्कादायक माहिती उघड

Delhi Red Fort car blast NIA investigation details : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून एनआयएने तपासात डॉक्टरांचे दहशतवादी जाळे उघड केले आहे. सहा राज्यांत मोठ्या प्रमाणावर छापेमारी करत १५ हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Namdeo Kumbhar

  • लाल किल्ल्याजवळ I20 कारमध्ये मोठा स्फोट होऊन १३ जणांचा मृत्यू झाला.

  • एनआयएने तपासात डॉक्टरांनी तयार केलेले दहशतवादी जाळे उघडकीस आणले

  • सहा राज्यांत छापेमारी करण्यात आली आहे.

  • आतापर्यंत १५ पेक्षा जास्त संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Doctors involved in terror network in Delhi blast case : राजधानी दिल्लीमध्ये १० नोव्हेंबर २०२५ रोजी ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला होता. हा दहशतवादी हल्ला असल्याचं तपास यंत्रणाकडून स्पष्ट करण्यात आले. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांकडून कसून चौकशी केली जातेय. कार स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थाकडून (NIA) डॉक्टरांच्या दहशतवादी जाळ्यावर कारवाई करण्यात आली आहे. NIA ने सहा राज्यांमध्ये छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली या सहा राज्यात एनआयएने छापा टाकलाय.

NIA ने दिल्ली स्फोटाचा सर्व बाजूने तपास केला आहे. एनआयएने यामध्ये डॉक्टरांच्या दहशतवादी जाळ्याला उघडकीस आणले आहे. व्हाईट कॉलर डॉक्टरांनी सोशल मीडिया ग्रुप्सद्वारे रेडिकलाइजेशन करून मोठ्या प्रमाणात दहशतवादी कट रचल्याचे तपासात समोर आलेय. या स्फोटामागे अल-फलाह मेडिकल कॉलेज, फरीदाबाद येथील डॉक्टरांचा दहशतवादी जाळे होते. या संबंधित असणाऱ्यांवर एनआयएने छापे टाकले आहेत. NIAने जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली या सहा राज्यांमध्ये छापे टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनएआयने आतापर्यंत १५ पेक्षा जास्त संशयितांना ताब्यात घेतले आहे.

स्फोटाजवळ ९ मिमी ३ काडतुसे सापडली

लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांनी तीन 9mm काडतुसे जप्त केली आहेत. यामधील दोन काडतुसे जिंवत आहेत. गोळीबार करण्यासाठी वापरलेली पिस्तूल अद्याप सापडलेली नाही. धक्कादायक म्हणजे, ही काडतुसे सर्वसामान्य नागरिकांना वापरण्यास परवानगी नाही. फक्त सुरक्षा दल आणि पोलिस अधिकारी याचा वापर करतात.

पोलिसांचे पिस्तुल- काडतुसे जशीच्या तशीच -

दिल्ली स्फोटाच्या ठिकाणी काडतुसे मिळल्यानंतर एकच खळबळ उडाली अन् तपासाला वेग आला. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी आपली काडतुसे अन् पिस्तुल तपासील. पण दिल्ली पोलिसांतील एकाही कर्मचाऱ्याचे पिस्तुल, काडतसे आहे तशीच आहेत. दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर हे काडतुसे आय२० कारमधून पडले की इतर कोणत्याही मार्गाने तिथे पोहोचले, याचा तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईतील नेव्हल डॉकयार्डवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आंध्र प्रदेशमधून आला फोन

Akon Video: धक्कादायक! भर कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध गायकाची टवाळखोरानी काढली पॅन्ट, VIDEO व्हायरल

Diabetes Care: डायबेटीजच्या रुग्णांनी कांदा खाणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Relationship Tips: पार्टनरकडे या गोष्टी सुद्धा मागाव्या लागतायत? तर हेच आहेत ब्रेकअपचे संकेत

Shocking News : "तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात..." जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, नाशिकमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT