लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता दिल्लीतही काँग्रेस आम आदमी पक्षासोबत आघाडी करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आम आदमी पार्टी चार तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवू शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दिल्लीत आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्यासाठी काँग्रेसला तीन जागा देऊ केल्या आहेत. यावर जवळपास एकमत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीने चांदनी चौक जागा काँग्रेसला देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
याशिवाय पूर्व दिल्ली आणि ईशान्येच्या जागा काँग्रेसला देण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. 'आप'च्या तीन जागांच्या ऑफरला दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे. (Latest Marathi News)
त्यामुळे आघाडी झाल्यास काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवू शकते. त्याचबरोबर आम आदमी पार्टी नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्लीच्या जागांवरून निवडणूक लढवू शकते. या आघाडीची औपचारिक घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात काँग्रेस 80 पैकी 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. सपा आणि त्यांचे मित्रपक्ष इतर 63 जागांवर निवडणूक लढवतील. यातच काँग्रेसने मध्य प्रदेशात सपाला एक जागा दिली आहे. बुधवारी सपा आणि काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी लखनऊमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाबाबत घोषणा केली.
यूपीमध्ये सपाने आपली एक जागा आझाद समाज पक्षाला दिली आहे. नगीना जागेवर त्यांचे नेते चंद्रशेखर आझाद निवडणूक लढवतील. सपाने रायबरेली, अमेठी, कानपूर नगर, फतेहपूर सिक्री, बांसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी, देवरिया या जागा काँग्रेसला दिल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.