BJP On Arvind Kejriwal ANI
देश विदेश

BJP On Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर भाजपची तिखट प्रतिक्रिया; दोन दिवसाचं गणितही सांगितलं

Arvind Kejriwal Announced Resign From CM Post: अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर भाजपने पहिली प्रतिक्रिया देत त्यांच्यावर टीका केली आहे.

Priya More

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगामधून बाहेर येताच मोठी घोषणा केली. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. त्यांच्या या घोषणेमुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर भाजपची प्रतिक्रया आली आहे. भाजपचे प्रवक्ते मंजिंदर सिंह सिरस यांनी यावर प्रतिक्रिया देत केजरीवाल यांचे दोन दिवसांचे गणितही सांगितले.

भाजपचे प्रवक्ते मंजिंदर सिंह सिरसा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे अरविंद केजरीवाल यांना हा निर्णय घ्यावा लागत आहे. अरविंद केजरीवाल २ दिवसांचा वेळ मागत आहेत. कारण त्यांना आमदारांना हे पटवून द्यायचं आहे की माझ्या पत्नीला तुम्ही मुख्यमंत्री करा. तुम्ही जनतेत जाणार असं म्हणत जनतेने ३ महिने आधीच आपला निर्णय सांगितला आहे. जनतेने तुम्हाला पुन्हा जेलमध्ये पाठवून दिल्लीत लोकसभेच्या ७ पैकी ७ जागा भाजपला जिंकून दिल्या होत्या.'

अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. दिल्लीमध्ये आपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. 'मी २ दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.', असे त्यांनी सांगितले.

कथित दारू घोटाळा प्रकरणात सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला होता. जामीन मिळाल्यानंतर शुक्रवारी अरविंद केजरीवाल तिहार जेलमधून बाहेर आले. शनिवारी केजरीवालांनी आपल्या पत्नीसह हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली आणि बजरंगबलीचे दर्शन घेतलं. त्यानंतर आज त्यांनी आप कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी केजरीवाल यांनी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT