Arvind kejriwal : 'माझी ताकद 100 पटीने वाढली', १५६ दिवसांनंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर; कार्यकर्त्यांनी जल्लोषात केलं स्वागत, VIDEO

Arvind kejriwal NEWS : ५६ दिवसांनंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.
१५६ दिवसांनंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर; कार्यकर्त्यांनी जल्लोषात केलं स्वागत
Arvind kejriwal Saam tv
Published On

नवी दिल्ली : कथित दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने १५६ दिवसांनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर शुक्रवारी सांयकाळी केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर आले आहेत. 'माझी ताकद 100 पटीने वाढली, अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर दिली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १५६ दिवसानंतर तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. तिहार जेल बाहेर त्यांच्या पक्षातील बड्या नेते हजर होते. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल आणि त्यांची मुलगी देखील उपस्थित होती. तिहार जेलनंतर मुख्यमंत्री केजरीवाल रोड शो करत घरी जाणार आहेत.

१५६ दिवसांनंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर; कार्यकर्त्यांनी जल्लोषात केलं स्वागत
Assembly Election 2024 : हरियाणात 'आप' बिघडवणार काँग्रेसचा खेळ? केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने का वाढली डोकेदुखी?

सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना शुक्रवारी सकाळी १० लाखांच्या जात मुचलक्यावर नियमीत जामीन मंजूर केला. ईडी प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून केजरीवाल यांना आधीच अंतरिम जामीन मिळाली होती. आबकारी प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी अटक केली होती. तर २६ जून रोजी सीबीआयने अटक केली होती.

१५६ दिवसांनंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर; कार्यकर्त्यांनी जल्लोषात केलं स्वागत
Bodybuilder Illia Golem : ६१ इंच छाती, २५ इंचाचा दंड, रोज १० लोकांचं जेवण खायचा; ३६ व्या वर्षी प्रसिद्ध बॉडी बिल्डरचा मृत्यू

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल म्हणाले, 'लोकांच्या आशीर्वादामुळे मी तुरुंगातून बाहेर आलो आहे. मी ताकद १०० टक्क्यांनी वाढली आहे. मी देश विरोधी शक्तीविरोधात लढत राहील. हा षडयंत्रावर विजय आहे. मी देवाचे आभार मानतो. मी जीवनभर लढत राहील. पुढेही लढत राहील'.

दरम्यान, केजरीवाल यांच्या सुटकेनंतर पक्षात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. पक्षाचे नेते कार्यालयात पोहोचले होते. केजरीवाल यांना आज सकाळी १० लाखांच्या जात मुचकल्यावर जामीन मंजूर झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com