Aam Aadmi Party Elected Opposition Party Leader Atishi saam tv
देश विदेश

Delhi Politics: दिल्लीवर 'लाडक्या बहिणीं'ची सत्ता! भाजपनंतर आपनंही खेळला 'महिला कार्ड'

Aam Aadmi Party Elected Opposition Party Leader: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि कलकाजी येथील आमदार आतिशी यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवलीय. आम आदमी पक्षाने त्यांची विरोधी पक्षनेत्या म्हणून निवड केलीय.

Bharat Jadhav

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी आणि कलकाजी येथील आपच्या आमदार यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवलीय. आम आदमी पक्षाने आतिशी यांची विरोधी पक्षनेत्या म्हणून निवड केलीय. आपच्या सर्व आमदारांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब केलं. यामुळे दिल्लीचं राजकारणात अजून पारा चढलाय. एकीकडे महिला मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांना कोंडीत पकडण्यासाठी 'आप'ने महिला उमेदवाराला विरोधी पक्षनेता म्हणून निवडलंय. देशातील राजकारणात हे पहिल्यांदा पाहायलाय मिळालंय.

विरोधी पक्ष नेता निवडी संदर्भात आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत, विरोधी पक्षनेत्या म्हणून आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव बुरारीचे आमदार संजीव झा यांनी मांडला होता. हा प्रस्ताव आपच्या इतर सर्व आमदारांनी स्वीकारला. त्यामुळे दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेत्याचं पद महिलेने भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच भारतातील कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याही महिला असणं हे पहिल्यांदा घडलंय.

विरोधी पक्षनेत्या म्हणून निवड झाल्यानंतर आतिशी म्हणाले की, भाजप दिल्लीच्या जनतेच्या सर्व आशा-आपेक्षा पूर्ण करेल, तसेच दिल्लीतील महिलांना आर्थिक साहाय्य देईल,अशी आशा आहे, असं आतिशी म्हणाल्या. आप एक मजबूत विरोधी पक्षाची भूमिका काय असू शकते हे दाखवेल. सर्व मुद्दे पूर्ण ताकदीने मांडले जातील. भाजपने दिलेली सर्व आश्वासने, विशेषत 8 मार्चपर्यंत शहरातील महिलांना दरमहा रु 2,500 पुरविण्याचे वचन, पूर्ण करणार का याकडे आमचे लक्ष असणार असल्याचं आतिशी म्हणाल्या.

पुढे बोलताना आतिशी म्हणाल्या की, आम्ही "आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेलं राज्य भाजपकडे सोपवलंय. "आप सरकारच्या 10 वर्षात दिल्लीचा अर्थसंकल्प 30,000 कोटी रुपयांवरून 77,000 कोटी रुपयांपर्यंत वाढला. विरोधी पक्ष म्हणून, आम्ही खात्री करू की भाजपने सर्व आश्वासने पूर्ण केली का नाही. दिल्लीशिवाय, असं दुसरे कोणतं राज्य नाहीये की, ज्याचं बजेट एका दशकात अडीच पटीने वाढले आहे." दिल्लीचे कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर 10 वर्षांत 6% वरून 3% पर्यंत खाली आले आहे, असंही त्या म्हणाल्या.

"दिल्लीच्या जनतेने तुमच्यावर भाजपवर विश्वास ठेवला आहे. तुम्हाला जनादेश दिला आहे. सबबी दाखवण्यापेक्षा तुम्ही त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करा," असे अतिशी यांनी भाजपला ठणकावून सांगितलं. तीन दिवसीय विधानसभेच्या अधिवेशनात कॅगचे अहवाल सादर करण्याच्या भाजपच्या घोषणेवर, आतिशी म्हणाले की ही एक नियमित प्रक्रिया आहे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे अहवाल एलजीच्या मंजुरीनंतर सभागृहाकडे पाठवले आहेत.

सर्वसहमतीने विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर केजरीवाल आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ कार्यकर्त्यांनी आतिशी यांचे अभिनंदन केले. X वरील एका पोस्टमध्ये केजरीवाल म्हणाले, "आतिशी जींचे सभागृहात आपचे नेते म्हणून निवड झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आप दिल्लीच्या लोकांच्या हितासाठी रचनात्मक विरोधाची भूमिका बजावतील", असं केजरीवाल म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किन्नरांच्या दोन गटात वाद, 1,500,000,000 रुपयांची संपत्ती; इंदूरच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

रस्त्यावरची दहशत कमी करण्यासाठी पुण्यात भटक्या कुत्र्यांना ट्रॅक करण्याचा नवा मार्ग

Diwali Pahat: दिवाळी पहाटचा कार्यक्रम पाहायचाय? तर मुंबईतील 'या' ५ ठिकाणांना नक्की भेट द्या

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे प्रसूती यशस्वीरित्या पार पाडणारा रिअल हिरो

Yuvraj Singh : वडिलांना साधा कुर्ता घेत नाही पण 'त्या' बाबाला १५ लाखांचं घड्याळ देतो, युवराज सिंगवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT