Chhava: 'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीमध्ये राडा; अकबर-बाबर रोडच्या बोर्डवर फासलं काळं, रस्त्यांची नावं बदलण्याची मागणी

Rada In Delhi: दिल्लीत 'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर संतप्त लोकांनी अकबर, बाबर आणि हुमायूनचे नाव रस्त्यावरून हटवावे, अशी मागणी केलीय. अकबर औरंगजेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप अन्याय केल्याचं मतही नागरिकांनी मांडलंय.
 Rada In Delhi On Chhava
Rada In Delhi On Chhavasaam tv
Published On

‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीत काही लोकांनी गोंधळ घातला. मोठा राडा करत अकबर, बाबर आणि हुमायून रोडचे नाव बदलण्याची मागणी या लोकांनी केली. राडा घालणाऱ्या लोकांना अकबरस, बाबर नाव असलेल्या रस्त्यांच्या बोर्डला काळ फासलं. अकबर, बाबर आणि हुमायूनचे नाव रस्त्यावरून हटवले पाहिजे, आमचे आमच्यावरचे कलंक आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप अन्याय केला होता.

दिल्लीमध्ये हिंदू सेनाने १४ सप्टेंबर २०१९ ला बाबर रोडच्या साइन बोर्डला काळं फासलं होतं. तसेच सरकारने अकबर-बाबर रोडचे नाव बदलावे, भारतीय व्यक्तीचे नाव देण्याची मागणीही, हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी केली होती. या रस्त्यांना परकीय आक्रमकांचे नाव देण्यात आले असल्याचेही गुप्ता म्हणाले होते.

३०० कोटींच्या उंबरठ्यावर 'छावा'

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केलेत. प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यातच या चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. 'छावा' चित्रपटात विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची भूमिका प्रभावीपणे मांडलीय.

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची क्रेझ वाढत जात आहे. 'छावा' चित्रपट लवकरच ३०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. ' आतापर्यंत 'छावा' चित्रपटाने 'पुष्पा २', जवान, ॲनिमल, पठाण, गदर २, स्त्री २,बाहुबली २ चे रेकॉर्ड ब्रेक केलेत. विकी कौशलने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. मात्र आजवरच्या करिअरमध्ये उंच भरारी घेणारा हा विकीचा 'छावा' चित्रपट ठरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com