DELHI POLICE MAJOR SHAKE-UP: 40 OFFICERS TRANSFERRED IN JUST 2 DAYS saam tv
देश विदेश

40 पोलीस अधिकाऱ्यांचा तडकाफडकी बदल्या; पोलीस दलात खळबळ

Delhi Police 40 Officers Transfer Reason Explained: दिल्ली पोलिसांत मोठा बदल! नवीन पोलिस आयुक्त अनुराग कुमार यांनी अवघ्या दोन दिवसांत 40 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या निर्णयामागचं कारण अद्याप स्पष्ट नाही.

Omkar Sonawane

दिल्ली पोलिसांत नवीन पोलिस आयुक्त अनुराग कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत मोठे प्रशासकीय बदल पाहायला मिळाले आहेत. सलग दोन दिवसांत 40 पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे बदल्या करण्यात आले आहेत. इतक्या कमी कालावधीत झालेल्या या मोठ्या बदल्यांमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

दिल्ली पोलीस मुख्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार गुरुवारी ३० आणि शुक्रवारी १० अशा एकूण ४० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ नवीन ठिकाणी हजर होऊन संबंधित जिल्हा किंवा युनिटच्या पोलीस उपायुक्तांना (DCP) अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कमी वेळेत मोठा बदल, पोलीस दलात चर्चांना उधाण

पोलीस विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन पोलिस आयुक्तांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर इतक्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बदली होणे असामान्य आहे. त्यामुळे या निर्णयाने पोलीस दलात चर्चांना उधाण आले आहे. या मोठ्या प्रशासकीय बदलामागील अधिकृत कारण अद्याप दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या निर्णयाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काही अधिकारी याला नवीन कार्यपद्धतीची सुरुवात मानत आहेत, तर काहींना हा निर्णय नियमित प्रशासकीय प्रक्रियेपेक्षा वेगळा वाटत आहे.

या बदलांदरम्यान महरौली, फतेहपूर बेरी, मयूर विहार, गोविंदपुरी आणि सीआर पार्क यांसारख्या महत्त्वाच्या ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या काही एसएचओंना (SHO) सुरक्षा आणि पीसीआरसारख्या नॉन-फील्ड युनिटमध्ये बदली करण्यात आली आहे. यामुळेही विभागात चर्चेला अधिक उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधी यांचा उद्धव ठाकरे यांना फोन

CJP च्या आंदोलनापूर्वीच पोलिसांची धरपकड; पदाधिकाऱ्यांना पहाटे घेतले ताब्यात

Mumbai : IIT बॉम्बेमध्ये मोठी दुर्घटना! हॉस्टेलमध्ये अचानक भीषण आग, ५ विद्यार्थी होरपळले

Chocolate Mousse Recipe: चॉकलेट प्रेमींसाठी खास घरच्या घरी करा क्रीमी स्वादिष्ट चॉकलेट मूस, वाचा सोपी रेसिपी

Cancer Drug Prices: मोदी सरकारचा मोठा निर्णय; कॅन्सरची औषधं 70 टक्क्यांनी होणार स्वस्त

SCROLL FOR NEXT