IPS Transfer: पाच IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली पोस्टिंग, जाणून घ्या

IPS Officers Transfers : उत्तर प्रदेश सरकारने पोलीस विभागात आणखी एक प्रशासकीय फेरबदल केलाय. पाच आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. योगी सरकारने जाहीर केलेले नवीन पदस्थापनेचे तपशील आणि महत्त्वाचे बदल जाणून घ्या.
IPS Transfer List :
IPS Officers Transferssaam tv
Published On
Summary
  • उत्तर प्रदेश सरकारने ५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या.

  • रामपूरचे एसपी सोमेंद्र मीना यांची आग्रा गुप्तचर विभागात बदली झाली.

  • अनिल कुमार सिंह यांच्याकडे रामपूर एसपीची जबाबदारी सोपवण्यात आली.

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने आज पोलीस विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल केलाय. राज्यातील आणखी ५ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदलींच्या यादीत रामपूरचे पोलीस अधीक्षक (SP) सोमेंद्र मीना यांचाही समावेश आहे.

IPS Transfer List :
राज्यातील २० IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, सरकारचा मध्यरात्री आदेश जारी
IPS Transfer List :
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ६ निरीक्षकांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली पोस्टिंग? जाणून घ्या

सरकारनं जारी केलेल्या आदेशानुसार अनिल कुमार सिंह (IPS-SPS-2015) यांची पोलीस अधीक्षक (सुरक्षा मुख्यालय, लखनौ) या पदावरून बदली करण्यात आली. आता त्यांच्याकडे पोलीस अधीक्षक, रामपूर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. रामपूर येथे कार्यरत असलेले सोमेंद्र मीना (IPS-RR-2017) यांची पोलीस अधीक्षक (प्रादेशिक गुप्तचर विभाग, आग्रा) या पदावर बदली करण्यात आली आहे.

IPS Transfer List :
राज्यातील ११५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबईत अनेक नव्या नियुक्त्या, वाचा कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, सध्या पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत असलेल्या अनिल कुमार सिंग यांची बदली रामपूर येथे त्याच पदावर करण्यात आली आहे. ललितपूरचे पोलीस अधीक्षक असलेले मोहम्मद मुश्ताक यांची आता लखनौ पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून बदली करण्यात आलीय.

दरम्यान, पोलीस आयुक्त कार्यालय, लखनौ येथील पोलीस उपायुक्त पदावरून गोपाल कृष्ण चौधरी यांची बदली 'पीएसी'च्या (PAC) ३२ व्या बटालियनचे कमांडंट (लखनौ) म्हणून करण्यात आली आहे. एटा येथील 'पीएसी'च्या ४३ व्या बटालियनचे कमांडंट असलेले संजीव कुमार बाजपेयी आता ललितपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहतील.

केवळ गेल्या आठवड्यातच मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या होत्या. त्याच्या अवघ्या एका आठवड्यापूर्वी, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या होत्या. अनेक जिल्ह्यांतील प्रशासकीय प्रमुख बदलण्यात आले आणि २० आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com