

सरकारने 115 पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
मुंबईसह राज्यातील विविध जिल्हे आणि विशेष शाखांमध्ये नव्या नियुक्त्या
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदेश जारी
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांनी जवळपास ११५ पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. राज्य सरकारने पोलीस उपअधीक्षक (DYSP) आणि समकक्ष दर्जाच्या ११५ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेचे आदेश जारी केलेत. गृह विभागाने काढलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्हे, आयुक्तालये आणि विशेष शाखांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस उपअधीक्षक जितेंद्र पोपटराव जाधव यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली . तर नागपूर शहरातील सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित शिवाजीराव पाटील यांची नांदेड येथे नागरी हक्क संरक्षण विभागात नियुक्ती झाली . पालघरच्या बोईसर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास संपत नाईक यांची नागपूर येथे नागरी हक्क संरक्षण विभागात बदली करण्यात आलीय.
नागपूर ग्रामीणच्या रामटेक उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सुदाम बरकते यांची भंडारा जिल्ह्यातील पवनी उपविभागात DYSP बदली करण्यात आलीय. पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त सचिन प्रकाश हिरे यांची पुणे शहरात नियुक्ती झाली आहे. नाशिक येथील ATS चे अपर पोलीस अधीक्षक माधव ज्ञानोबा रेड्डी यांची नाशिक शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आलीय.
ठाणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त अमोल विलास कोळी यांची यवतमाळ उपविभागात पोलीस उपअधीक्षक बदली झालीय. मीरा-भाईंदर वसई-विरार येथील सहायक पोलीस आयुक्त उमेश शंकर माने (पाटील) यांची सांगली येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. ठाणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त मंदार मल्लिकार्जुन जावळे यांची परिवहन विभागाच्या दक्षता शाखेत बदली झालीय.
मीरा-भाईंदर वसई-विरारचे सहायक पोलीस आयुक्त बजरंग बहादुरराव देसाई यांची नवी मुंबईत बदली करण्यात आली आहे. पुणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त नंदिनी अमित वग्यानी (नंदा राजेंद्र पराजे) यांची पुणे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सई प्रताप भोरे-पाटील यांची पुणे येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत बदली करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त विशाल शामराव हिरे यांची नवी मुंबईत नियुक्ती झालीय. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड उपविभागाचे अधिकारी दिनेशकुमार माधवराव कोल्हे यांची सीआयडी, छत्रपती संभाजीनगर येथे अपर पोलीस अधीक्षक (एटीएस) पदावर बदली झालीय. सातारा शहर उपविभागाचे अधिकारी राजीव धुराजी नवले यांची पुणे सीआयडीमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक ग्रामीणमधील कळवण उपविभागाचे अधिकारी किरणकुमार चंद्रकांत सूर्यवंशी यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या कोकण घटक येथे अपर उपआयुक्त (एटीएस) म्हणून बदली झालीय. नागपूर ग्रामीणच्या कामठी उपविभागातील अधिकारी संतोष बाबुराव गायकवाड यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. सोलापूर ग्रामीणमधील अक्कलकोट उपविभागाचे अधिकारी विलास विठ्ठल यामावार यांची पुणे सीआयडीमध्ये बदली झालीय.
पुणे ग्रामीणच्या शिरूर उपविभागाचे अधिकारी प्रशांत बाबासो ढोले यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोलीतील घोट उपविभागाचे अधिकारी जगदीश रामराव पांडे यांची अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झालीय. ठाणे ग्रामीणच्या शहापूर उपविभागातील अधिकारी मिलिंद देवराम शिंदे यांची ठाणे शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पूनम संभाजी पाटील यांची नाशिक शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली झालीय. धाराशिवच्या तुळजापूर उपविभागाचे अधिकारी निलेश विश्वासराव देशमुख आणि ठाणे शहरातील प्रिया देविदास डमाळे यांची पिंपरी-चिंचवड डीवायएसपी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. पुणे सीआयडीमधील अपर पोलीस अधीक्षक तृप्ती अर्जुन जाधव यांची धाराशिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत बदली झालीय. नांदेडच्या देगलूर उपविभागाचे अधिकारी संकेत सतीश गोसावी यांची पुणे सीआयडीमध्ये बदली झालीय.
पुणे ग्रामीणच्या बारामती उपविभागाचे अधिकारी सुदर्शन साईदास राठोड यांची पिंपरी-चिंचवड येथे नियुक्ती. सोलापूर ग्रामीणचे अधिकारी संकेत नथुराम देवळेकर यांची परभणी शहर उपविभागात बदली. गोंदियातील तिरोडा उपविभागाचे अधिकारी साहील उमाकांत झरकर यांची चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी उपविभागात नियुक्ती झालीय.
सांगलीच्या मिरज उपविभागाचे अधिकारी प्रणिल प्रफुल्ल गिल्डा यांची कोल्हापूरच्या शाहूवाडी उपविभागात नियुक्ती. कोल्हापूरच्या करवीर उपविभागातील सुजीतकुमार आण्णा क्षीरसागर यांची अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत उपविभागात बदली.
गडचिरोलीच्या कुरखेडा उपविभागाचे अधिकारी रविंद्र दिनकर भोसले यांची शिरूर उपविभाग, पुणे येथे बदली झालीय. परभणीतील पूर्णा उपविभागाचे अधिकारी समाधान माधवराव पाटील यांची गडचिरोलीच्या सिरोंचा उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. गोंदियाच्या देवरी उपविभागाचे अधिकारी विवेक हरिदास पाटील यांची कोल्हापूरच्या गडहिंग्लज उपविभागात बदली झालीय.
गडचिरोली मुख्यालयातील पोलीस उपअधीक्षक योगेश चंद्रकांत रांजणकर, गोंदियाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी ज्ञानदेव बाणकर आणि बुलढाण्यातील देऊळगावराजा उपविभागाच्या अधिकारी मनीषा विश्वंभर कदम यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गोंदियाच्या आमगाव उपविभागाचे अधिकारी प्रमोद मयाराम मडामे यांची नागपूर ग्रामीणच्या कामठी उपविभागात बदली झालीय. गडचिरोलीच्या एटापल्ली उपविभागाचे अधिकारी चैतन्य वसंतराव कदम यांची बारामती उपविभागात नियुक्ती करण्यात आलीय. सांगलीच्या विटा उपविभागाचे अधिकारी विपुल विजय पाटील यांची बुलढाणा उपविभागात बदली .
यवतमाळ उपविभागातील दिनेश किसन बैसाने यांची पालघरच्या बोईसर उपविभागात नियुक्ती झाली आहे. गडचिरोली उपविभागातील सूरज विठ्ठल जगताप यांची सोलापूर ग्रामीण उपविभागात बदली करण्यात आलीय. पालघरच्या डहाणू उपविभागातील अंकिता कैलास कणसे यांची ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.
यवतमाळच्या उमरखेड उपविभागातील हनुमंत अमृतराव गायकवाड यांची नंदुरबार उपविभागात बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय मारुती थोपटे यांची रत्नागिरी उपविभागात नियुक्ती करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.