दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि झारखंड एटीएसची संयुक्त कारवाई.
मुंबईच्या आफताबसह ८ संशयितांना अटक, १२ ठिकाणी छापेमारी.
स्फोटक, शस्त्रं आणि डिजिटल पुरावे जप्त.
आयसिस दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त, देशभरात तपास सुरू.
Delhi Police bust ISIS terror module in India full details : दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि झारखंड एटीएस यांनी झारखंडमध्ये संयुक्त कारवाई करत ८ ते १० जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांचा ISIS दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. त्याबाबतचे पुरावेही स्पेशल सेलकडे आहेत. पोलिसांनी मुंबईहून रांचीला आलेल्या आफताब आणि त्यांचा म्होरक्या अशहर दानिश यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. झारखंड अन् आजूबाजूच्या परिसरात असलेल्या दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलेय.
स्पेशल सेल आणि एटीएसने एकत्र कारवाई करत रांचीमधील लोअर बाजारमधील तबारक लॉजमधून आयएसआयएससोबत असलेल्या संशयिताला अटक केले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात विस्फोटक केमिकल, बंदुका अन् इलेक्टॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. दिल्लीमध्येही एका संशयीत दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत १२ ठिकाणी छापमारी केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ८ संशयितांना ताब्यात घेतले आहे. तबारक लॉजमध्ये लपवलेल्या काही जणांना शस्त्र अन् विस्फोटक साहित्यासह अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येतेय.
राजधानी दिल्लीमध्ये आफताब नावाच्या दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या आहेत. आफताब हा मुंबईमधील राहणारा आहे. तो दहशतवादी मॉड्यूलचा महत्त्वाचा हिस्सा असल्याची माहिती समोर आले आहे. या दहशतवादी नेटवर्कची निगडीत असणाऱ्या दानिश याला पोलिसांनी रांचीमधील इस्लामनगर येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्सयंत देशबरात १२ ठिकाणी या प्रकरणात छापा मारण्यात आला आहे. विविध ठिकाणाहून आतापर्यंत ८ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलेय. स्पेशल सेलच्या तपासात अनेक धक्कादायक पुरावे अन् शस्त्रसाठा मिळाला आहे. दहशतवाद्याचे हे मॉड्युल देशभरात सुरू असल्याचा संशय आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर कोणकोणती स्थानके अन् लोक आहेत? याचा तपास स्पेशल सेल अन् गुप्तचर संघटनेकडून घेण्यात येतोय. .
दिल्ली पोलिसांनी एका सिक्रेट टीपच्या आधारावर दिल्लीमधून आफताब याला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्याची कसून चकशी करण्यात आली. पोलिसांच्या सुरूवातीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आफताबने दिल्लीमध्ये मोठ्या हल्ल्याचा कट आखला होता, असे तपासात उघड झाले. आफताबच्या घरातून पोलिसांनी आपत्तीजनक साहित्य, व्हिडिओ अन् डिजिटल पुरावे जप्त केले आहे. या सर्व पुराव्याचा कसून तपास केला जातोय. दरम्यान, आफताबकडील माहितीच्या आधारावर पोलिसांनी झारखंडमध्ये छापा टाकला. पोलिसानी अझहर अर्फ दानिश याला ताब्यात घेतलेय. दानिश याचे ISISसोबत कनेक्शन असल्याचे तपासातून समोर आलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.