Delhi Crime News / CCTV Footage  SAAM TV
देश विदेश

Delhi Crime News : श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती; मुलाच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

दिल्लीत धक्कादायक घटना उघड झालीय. महिलेनं पतीच्या शरीराचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. नंतर मुलाच्या मदतीनं त्यांची विल्हेवाट लावली.

Nandkumar Joshi

Delhi Crime News : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानं संपूर्ण देश हादरला असतानाच, दिल्लीत अशीच आणखी एक घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या पथकाला पूर्व दिल्लीत सापडलेल्या शरीराच्या अवयवांचं गूढ उकलण्यात यश आले आहे. या प्रकरणात एका महिलेसह तिच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचनं दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या मुलाच्या साथीने पतीची हत्या केली. तिच्या पतीचं अन्य एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, असं सांगितले जात आहे. महिलेने पतीच्या हत्येनंतर त्याचे २२ तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते पूर्व दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. (Latest Marathi News)

पांडव नगरमध्ये राहणाऱ्या अंजन दास याची हत्या याच वर्षी जूनमध्ये झाली होती. त्याच्या हत्येनंतर शरीराचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर रोज ते तुकडे पांडव नगर आणि पूर्व दिल्लीच्या वेगवेगळ्या परिसरांत फेकण्यात आले होते. अंजन दासची पत्नी पूनम आणि त्याचा मुलग दीपक यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. अंजन दासला नशेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली, अशी माहिती उघड झाली आहे. (Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, अंजन दास याची हत्या ही अनैतिक संबंधांतून झाली आहे. मृतदेहाचे तुकडे घेऊन जाताना आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. आरोपी पूनम आणि तिचा मुलगा दीपक यांनी अनैतिक संबंधांवरून दास याची जूनमध्ये हत्या केली होती. दासची हत्या करण्याआधी त्याला झोपेच्या गोळ्या पेयातून दिल्या.

आरोपींनी कथितरित्या त्याच्या शरीराचे तुकडे केले. ते फ्रीजमध्ये ठेवले. हे प्रकरण लपवण्यासाठी ते तुकडे पांडव नगर परिसर आणि पूर्व दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दीपक हा रात्री उशिरा बॅग घेऊन फिरताना दिसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तुकडे फेकतानाही फुटेजमध्ये आढळून आले आहे. दीपकच्या पाठीमागे त्याची आई पूनमही दिसून आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? समोर आली मोठी अपडेट

वकिलानं महिलेला ओढलं अन् किस करत.. हाय कोर्टाच्या व्हर्च्यूअल सुनावणीमध्ये काय घडलं? VIDEO व्हायरल

Gold Rate Today : धनत्रयोदशीआधी सोन्याची दिवाळी, एक तोळा सोन्याची किंमत १.२८ लाख

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT