Delhi Coaching Incident Saam TV
देश विदेश

Delhi Coaching Incident: दिल्लीतील कोचिंग सेंटर प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत तिघांचा मृत्यू; विद्यार्थ्यांचा धक्कादायक दावा

Priya More

दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमधील (Rajendra Nagar) राव आयएएस स्टडी सेंटरच्या (Rao IAS Study Center) बेसमेंटमध्ये पाणी साचल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ३ वर पोहचली आहे. या घटनेमध्ये आतपर्यंत दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने तिसऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला आहे. घटनास्थळी शोध मोहिम सुरू आहे. या घटनेप्रकरणी विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरबाहेर आंदोलन करण्यास सुरूवात केली. अशातच या प्रकरणात विद्यार्थ्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. फक्त तिघांचा नाही तर ८ ते १० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा एका विद्यार्थ्याने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

एमसीडीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या एका विद्यार्थ्याने सरकारच्या दाव्यांव्यतिरिक्त वेगळा खुलासा केला आहे. या विद्यार्थ्याने सांगितले की, 'एमसीडी म्हणते की ही आपत्ती आहे. पण मी म्हणेन की हे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अर्ध्या तासाच्या पावसानंतर याठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी भरते. आपत्ती ही कधी तरी घडणारी गोष्ट आहे. माझ्या घरमालकाने सांगितले की तो गेल्या १०-१२ दिवसांपासून नगरसेवकाला नाला साफ करण्यासाठी सांगत होता. दोषींवर कारवाई करावी ही आमची पहिली मागणी आहे. जखमी आणि मृतांचा खरा आकडा तात्काळ जाहीर करावा ही देखील आमची मागणी आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या लोकांनी मला सांगितले की ८ ते १० जणांचा मृत्यू झाला आहे.'

कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये वाचनालय असल्याचे तपासात समोर आले आहे. वाचनालयामध्ये साधारणपणे ३० ते ३५ मुलं असायची. अचानक बेसमेंटमध्ये वेगाने पाणी भरू लागले. बेसमेंटमधील बाकांवर विद्यार्थी उभे होते. पाण्याच्या दाबाने बेसमेंटमधील काच फुटू लागली. बेसमेंटमध्ये पाणी वाढू लागल्यामुळे त्याठिकाणी असणारे काही विद्यार्थी पळत बाहेर पडले. पण काही जण अडकले. त्यामधील तिघांचा मृत्यू झाला. बेसमेंटमध्ये असणाऱ्या वाचनालयामध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे. याठिकाणी बायोमॅट्रिक यंत्रणा देखील बसवली आहे.

राजेंद्र नगरच्या राव कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर अनेक पंप लावून पाणी बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीमही सुरू होती. अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी सांगितले की, येथे पाणी साचण्याची समस्या नवीन नाही. यापूर्वीच्या पावसात अनेकवेळा पार्किंगमध्ये पाणी साचले होते. अनेकवेळा बेसमेंटमध्ये पाणी शिरले. असे असतानाही कोचिंग सेंटर प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. या घटनेवरून आता विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

या कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे. दिल्ली सरकारने मुख्य सचिवांना २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश जारी करताना महसूल मंत्री आतिशी म्हणाले की, 'ही अत्यंत दुर्दैवी घटना असून त्याची तातडीने चौकशी करण्यात यावी. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT