Dhule News : केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन; अर्थसंकल्पाचा केला निषेध

Dhule News : अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाट्याला घोषणांचा पाऊस करून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केल्याचे म्हणत, केंद्राचा हा अर्थसंकल्प सामान्य नागरिकांना कुठलाही दिलासा देणारा नाही.
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा सामान्य नागरिकांना दिलासा न देणारा अर्थसंकल्प आहे. असे म्हणत केंद्र शासनाचा विरोधात शिंदखेडा तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांतर्फे आंदोलन करत जाहीर निषेध करण्यात आला आहे. 

Dhule News
Shindkheda Rain : दरवर्षीच्या तुलनेत यंदा शिंदखेडा तालुक्यात जास्त पाऊस; बंधारे पाण्याने भरले तुडुंब

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी मंगळवारी केंद्राचा अर्थसंकल्प (Union Budget) सादर केला. या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाट्याला घोषणांचा पाऊस करून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केल्याचे म्हणत, केंद्राचा हा अर्थसंकल्प (Dhule) सामान्य नागरिकांना कुठलाही दिलासा देणारा नाही. उलट महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, मध्यमवर्ग यांच्यासाठी क्रांतिकारी योजना या अर्थसंकल्पात नाही. 

Dhule News
Ahmednagar Accident : भरधाव ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला खाली; मोठी दुर्घटना टळली

त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दीडपट हमीभाव व उत्पन्न दुप्पट करण्याची आश्वासने ही निवडणुकीतील फसवीगिरी ठरली असल्याचा आरोप देखील यावेळी लावण्यात आला आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने (Shindkheda) शिंदखेडा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस संदीप दादा बेडसे यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com