Manish Sisodia Saam Tv
देश विदेश

Delhi: मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक; 8 तासाच्या चौकशीनंतर CBI ची कारवाई

आठ तास चौकशी केल्यानंतर सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

Delhi: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आठ तास चौकशी केल्यानंतर सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) अटक केली आहे. तत्पूर्वी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांची चौकशी केली. या चौकशीसाठी ते सकाळी 11.10 वाजता दिल्लीतील  सीबीआयच्या मुख्य कार्यलयात पोहोचले होते. 

अटक होण्याआधी सिसोदिया यांनी ट्वीट करत म्हटलं होत की, ''आज पुन्हा सीबीआय मुख्यालयात जात आहे, मी तपासात पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचे प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.'' त्याच ट्विटमध्ये ते म्हणाले की, ''मला काही महिने तुरुंगात राहावे लागले तरी मला पर्वा नाही. देशासाठी ज्या भगत सिंहांना फाशी देण्यात आली त्यांचा मी अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणे ही छोटी गोष्ट आहे.''

या दरम्यान सिसोदिया यांचं मनोबल वाढवण्यासाठी हजारो कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर पोहोचले होते. सिसोदिया यांच्या घराबाहेर प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अखेर चौकशीनंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: प्रसिद्ध अभिनेता अन् गायकाचे हार्ट अटॅकने निधन, शेवटची पोस्ट चर्चेत

Scholarship Exam 2025-26 : शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

Maharashtra Live News Update: वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात आली, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास

भाजप नेत्याच्या बेडरूमला आग, रॉकेट थेट बाल्कनीत घुसला; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं अन्..

Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

SCROLL FOR NEXT