K. Kavitha Arrested Saam Tv
देश विदेश

K. Kavitha: BRSच्या नेत्या के.कविता यांच्या अडचणीत वाढ, ईडीनंतर आता सीबीआयने केली अटक

Delhi Excise Policy Case: ईडीनंतर आता सीबीआयनेही अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने के. कविता यांना अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयने (CBI) शनिवारी 6 तास कविता यांची चौकशी केली.

Priya More

Delhi Liquor Scam:

दिल्ली दारू घोटाळ्याशी (Delhi Liquor Scam) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अटकेत असलेल्या भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएसच्या नेत्या के. कविता (BRS Leader K. Kavitha) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. ईडीनंतर आता सीबीआयनेही अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी  (Delhi Excise Policy Case)  कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने के. कविता यांना अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयने (CBI) शनिवारी 6 तास कविता यांची चौकशी केली. त्यानंतर सीबीआयने आज तिहार तुरुंगातून के. कविता यांना अटक केली.

दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कविता यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. कविता यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात बीआरएस नेता सध्या तिहार तुरुंग क्रमांक 6 मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. कविता यांना ईडीने १५ मार्च रोजी अटक केली होती. 26 मार्च रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने के. कविता यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती.

सीबीआयने बुधवारी दिल्ली न्यायालयात सांगितले की, त्यांनी कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात बीआरएस नेत्या के. कविता यांची तिहार सेंट्रल जेलमध्ये चौकशी करण्यात आली. ५ एप्रिल रोजी न्यायालयाने सीबीआयला कविताची तुरुंगात चौकशी करण्याची परवानगी दिली होती. त्या आदेशाला कविता यांनी आव्हान देखील दिले आहे.

सीबीआयने ईडी आणि सीबीआय प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांना कळवले होते की, न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी बीआरएसच्या नेत्या कविता यांची 6 एप्रिल रोजी चौकशी केली होती. कोठडीत चौकशीची विनंती करणाऱ्या सीबीआयच्या याचिकेच्या संदर्भात कविता यांच्या वतीने हजर असलेले वकील नितीश राणा यांनी दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना केंद्रीय तपास यंत्रणेने हा युक्तिवाद केला. सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, त्यांनी कविता यांची आधीच चौकशी केली आहे. त्यामुळे ते त्यांच्या अर्जावर कोणतेही उत्तर दाखल करणार नाही. वकील नितेश राणा यांनी मात्र सीबीआयच्या याचिकेविरुद्ध कविता यांच्या अर्जावर आपण युक्तिवाद करू इच्छित असल्याचे न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी 26 एप्रिल रोजी होणार आहे. ईडीने के कविताला 15 मार्च रोजी कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली आहे. याआधी आपचे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूड अभिनेत्रीचा कारनामा! निर्मात्याला डांबून ठेवलं, बंदुकीचा धाक दाखवून १० लाख रूपये उकळले, सिनेसृष्टीत खळबळ

Maharashtra Live News Update: धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे महा एल्गार सभा

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय! १०० कोटींची इमारत खरेदी करणार

Nashik Tourism: हिरवागार निसर्ग आणि थंडगार वारा! नाशिकवरुन फक्त २५ किलोमीटरवर असलेल्या 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या

Blood Moon 2025: आज भारतात दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ब्लड मूनची अद्भुत दृश्यं पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT