Delhi Mumbai Expressway  
देश विदेश

Delhi Mumbai Expressway: अक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालेल्या हायवेवर 'या 'चुका करू नका, नाहीतर बनेल Video

Delhi Mumbai Expressway: दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर भाजप नेते मनोहर धाकड यांनी त्यांची गाडी थांबवून आक्षेपार्ह कृत्य केलं होतं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला होता. ज्या हायवेवर हा व्हिडिओ बनला होता, त्या हायवेवर अनेक नियम आहेत.

Bharat Jadhav

एक्सप्रेसवेवरून प्रवास आरामदायी असतं. हायवेवरील सुरक्षेसाठी काही नियम देखील बनवले जातात. त्याबद्दल लोकांना अनेकदा माहिती नसते. लोकांना माहित नाही की कॅमेरे कुठे बसवले आहेत आणि त्यांच्यावर कुठून नजर ठेवली जाते. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर भाजप नेते मनोहर धाकड यांनी त्यांची गाडी थांबवून आक्षेपार्ह कृत्य केलं होतं.

त्याच्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. दरम्यान धाकड यांचा व्हिडिओ ज्या हायवेवरचा आहे त्या हायवेचे काही नियम आहेत. ते नियम अनेकांना माहिती नाहीत. जर तुम्ही दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवरून प्रवास करत असाल तर या वाहतूक नियमांचे पालन करायला विसरू नका. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर बारकाईने लक्ष ठेवले जाते.

यासाठी हाय-टेक सुविधा आहेत. जर तुम्ही या एक्सप्रेस वेवरून प्रवास करत असाल तर आपत्कालीन परिस्थिती वगळता तुम्ही तुमचे वाहन रस्त्याच्या मध्यभागी कुठेही पार्क करू शकत नाहीत.तुम्ही तुमचे वाहन फक्त विश्रांती क्षेत्रातच पार्क करू शकता. जर तुम्ही एक्सप्रेसवेच्या बाजूला तुमचे वाहन पार्क करून सेल्फी काढताना किंवा लघवी करताना आढळलात तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर कडक नजर ठेवण्यासाठी, एनएचएआयने त्याला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले आहे. एक्सप्रेस वेवर एएनपीआर कॅमेरे, स्पीड डिटेक्शन सिस्टम, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ज्याद्वारे वाहतूक नियम मोडणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाते. ANPR च्या कॅमेरे नंबर प्लेट स्कॅन केली जाते. याशिवाय हाय स्पीड आणि विनाकारण वाहने थांबवणाऱ्यांना ओळखतात. प्रत्येक २० ते ३० किलोमीटरनंतर स्पीड कॅमेरे लावण्यात आले आहेत. जे जलदगतीने जाणाऱ्या वाहनांनावर नजर ठेवतात. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेची सर्वाधिक स्पीड १२० किमी प्रति घंटा आहे. जर तुमचं वाहन १२० किमीच्या वरती धावू लागले तर तुमचे चलान कापले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT