हायवेवर महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणारा नेता मनोहरलाल धाकडला जामीन, अटकेच्या दुसऱ्याच दिवशी सुटका

Manoharlal Dhakad News : एक्स्प्रेस हायवेवर अश्लील कृत्य करतानाचा मनोहर लाल धाकडचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला होता. या प्रकरणात काल त्याला मध्यप्रदेशातील मंदसौर येथील भानपुरा पोलिसांनी अटक केली होती. पण आज लगेच धाकडला जामीन मिळाला.
manohar lal dhakad got bail
manohar lal dhakad got bailx
Published On

Delhi Mumbai हायवेवर शारीरिक संबंध केल्याप्रकरणी मनोहर लाल धाकडला अटक झाली होती. पण आज (२६ मे) त्याला जामीन देण्यात आला आहे. न्यायालयाने धाकडचा जामीन मंजूर केल्याचे म्हटले जात आहे. धाकडचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-मुंबई हायवेवर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी कथित भाजप नेता मनोहर लाल धाकडला काल (२५ मे) अटक करण्यात आली होती. पोलिसांनी धाकडला न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने मनोहर लाल धाकडला तुरुंगात पाठवण्याचा आदेश दिला होता. पण आज धाकडला जामीन मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

manohar lal dhakad got bail
स्कूटीवरून आला; लेकीसमोर आईला KISS करुन पळाला, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

मनोहर लाल धाकड एका महिलेसोबत दिल्ली मुंबई हायवेवर शारीरिक संबंध करतानाचा व्हिडीओ लीक झाला होता. १३ मेच्या रात्री हा व्हिडीओ रेकॉर्ड झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अश्लील कृत्य करताना धाकड आणि महिलेने रस्त्याच्या मध्ये नाच केला होता. तेव्हा तैनात असलेल्या टोल कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यांनी व्हिडीओ लीक करु अशी धाकडला धमकी दिली. पण त्याने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा कर्मचाऱ्यांनी व्हिडीओ शेअर केला.

manohar lal dhakad got bail
MP: आणखी एक 'निर्भया'! प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड अन्...; गर्भाशय शरीराबाहेर आढळलं, नराधमांचं महिलेसोबत अमानवी कृत्य

पोलिसांनी मनोहर लाल धाकडची चौकशी केल्यानंतर त्याला काल (२५ मे) अटक केली. त्याच्याकडे ज्या कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली होती याचा तपास पोलीस करत आहेत. त्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान अटकेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मनोहर लाल धाकडला जामीन मंजूर झाल्याने खळबळ उडाली आहे.

manohar lal dhakad got bail
संतापजनक! CRPF जवानानंच केली गद्दारी; २ वर्षांपासून पाकिस्तानसाठी हेरगिरी, अत्यंत संवेदनशील माहिती शेअर केल्याचं उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com