Delhi Metro Viral Girl Saam tv
देश विदेश

Delhi Metro Viral Girl: दिल्लीच्या मेट्रोमध्ये विचित्र कपडे घालून फिरणारी तरुणी आहे तरी कोण? नेटकरी करताहेत उर्फीशी तुलना

Delhi Metro Viral Latest Video: दिल्लीतील एक विचित्र कपडे घातलेली तरुणी चर्चेत आली आहे.

Vishal Gangurde

Delhi Viral Video News : सोशल मीडियावर उर्फी जावेदच्या विचित्र कपड्याची जोरदार चर्चा होत असते. नेटकरी उर्फीला तिच्या कपड्यावर प्रचंड ट्रोल करत असतात. याचदरम्यान, दिल्लीतील एक विचित्र कपडे घातलेली तरुणी चर्चेत आली आहे. या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

विचित्र कपडे घातलेल्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर तिचे तोकडे कपडे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या कपड्यावरून सोशल मीडियावर (Social Media) दोन गट पडले आहेत. अनेक जणांकडून तिच्या चारित्र्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

काही जण तिच्या कपड्याच्या घालण्याच्या स्टाईलची थेट उर्फीशी तुलना करत आहेत. उर्फीच्या अतरंगी कपड्याची नेहमी चर्चा होत असते. त्यानंतर आता दिल्लीच्या मेट्रोमध्ये विचित्र कपडे घालणाऱ्या ऋदम चनाना हिची चर्चा होत आहे.

कपड्यावरील चर्चेवर ऋदमाचं म्हणणं आहे की,मला कोणत्याही प्रकारचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य आहे. ऋदमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून तिला मेसेज करून व्हायरल तरुणी, तूच आहे का, असे विचारत आहे. त्यांच्या प्रश्नाला ऋदम देखील प्रत्युत्तर देत आहे.

ऋदम चनानाचं म्हणणं काय आहे?

एका मुलाखतीत ऋदमाने तिचं मत मांडलं आहे. ऋदमाचं म्हणणं आहे की, 'मी प्रसिद्धीसाठी किंवा पब्लिकसिटी स्टंटसाठी प्रकार केला नाही. लोक काय म्हणतात, याची मला चिंता नाही. उर्फी जावेदला पाहून असे कपडे घालण्यास सुरूवात केली. काही दिवस आधीच माझ्या मित्रांनी उर्फीचा फोटो दाखवला होता, असं ऋदमा म्हणाली.

'कोणतीही निवड एका दिवसात होत नाही. त्याची एक प्रक्रिया आहे. माझं संपूर्ण कुटुंब रुढीवादी विचारांचं आहे. मला असे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य नाही. त्यामुळे एक दिवस ठरवलं की, माझ्या मनाला जे वाटेल, तशीच वागेल. मी अनेक महिन्यांपासून अशाच प्रकारे कपडे घालून फिरत आहे. माझे शेजारी मला माझ्या कपड्यावरून धमकी देत असतात. पण मला त्याची चिंता नाही, असंही ती म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Fasting: गुरुवारी उपवास केल्याने कोणते लाभ होतात?

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT