Shreya Maskar
मक्याची भाकरी बनवण्यासाठी मक्याचे पीठ, पाणी, मीठ इत्यादी साहित्य लागते.
मक्याची भाकरी बनवण्यासाठी एका ताटात मक्याचे पीठ घालून त्यात मीठ टाका.
यात गरम पाणी टाकून पीठ चांगले मऊ मळून घ्या.
पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
पोळपाटावर सुके पीठ लावून भाकरी गोल थापून घ्या.
तव्यावर तेल टाकून मक्याची भाकरी दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
मक्याची भाकरी तुटू नये म्हणून तुम्ही त्यात ज्वारीचे पीठ टाकू शकता.
मक्याच्या भाकरीमध्ये फायबर आणि पोषक घटक भरपूर असतात.