Shreya Maskar
रवा-मसाला पुरी बनवण्यासाठी रवा, पाणी, बेसन, गव्हाचे पीठ, आले -हिरवी मिरची पेस्ट, हळद, जिरे, मीठ, चिली फ्लेक्स, गरम मसाला, कोथिंबीर, ओवा, कसुरी मेथी आणि जिरे इत्यादी साहित्य लागते.
रवा-मसाला पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम ताटात पाणी टाकून रवा 10 मिनिटे भिजवून घ्या.
भिजलेल्या रव्यात बेसन, गव्हाचे पीठ, आले -हिरवी मिरची पेस्ट, हळद, जिरे पावडर, मीठ, धणे पूड, चिली फ्लेक्स टाकून मिक्स करा.
त्यानंतर या मिश्रणात गरम मसाला, कसुरी मेथी, ओवा, जिरे, हिंग, कोथिंबीर, तेल घालून कणिक मळून घ्या.
मळलेल्या कणिकेला वरून तेल लावून 15 ते 20 मिनिटे पीठ झाकून ठेवा.
कणिकेचे गोळे करून त्याच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या.
पॅनमध्ये तेल तापवून लाटलेल्या पुऱ्या खरपूस तळून घ्या.
गरमागरम चहा आणि रवा-मसाला पुरीचा आस्वाद घ्या.