Viral Video : सध्या सर्वत्र कडक उन्हाळा सुरू आहे. दुपारच्या वेळी उन्हाने जीवाची लाहीलाही होते. उन्हापासून आणि गरमीपासून स्वत:चे रक्षण व्हावे यासाठी अनेक जण ऐसी, कुलर थंड पाणी मिळावे म्हणून फ्रिज अशा गोष्टी विकत घेतात. कारमध्ये प्रवास करताना बऱ्याचदा एसी नसेल तेव्हा काही व्यक्ती छोट्या पंख्याचा वापर करतात. आता एका बाबांनी उन्हापासून आपलं संरक्षण करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. (Desi Jugad)
या बाबांना सतत बाहेर फिरावे लागते त्यामुळे उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी त्यांनी चक्क आपल्या डोक्यावर पंखा बसवून घेतला आहे. एका व्यक्तीने या वृद्ध बाबांशी बातचीत करत हा पंखा नेमका का लावला याचा काय उपयोग? अशा सर्व गोष्टी त्यांना विचारल्या आहेत. तसेच सदर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी पोटदुखेपर्यंत हसत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका वृद्ध बाबांनी त्यांच्या डोक्यावर पंखा बसवला आहे. हा पंखा कोणत्याही विजेवर किंवा सेलवर चालणारा नसून सौरउर्जेवर चालणारा आहे. त्यामुळे या बाबांनी आपल्या डोक्यावरच पंख्याच्या आधी एक सोलारपॅनल बसवून घेतलं आहे. सध्या उन्हाळा फार वाढला आहे. त्यामुळे मी डोक्यावर हा पंखा बसवला आहे. हा पंखा फक्त उन असल्यावर चालतो. जेव्हा कडक उन असते तेव्हा पंखा जास्त फास्ट फिरतो आणि थंड हवा मिळते.
उन जसजसे कमी होत जाते तसतसा या पंख्याचा वेग कमी होतो आणि हवा देखील कमी होत जाते, असं हे वृद्ध बाबा सांगत आहेत. उन्हापासून वाचण्यासाठीची त्यांची ही शक्कल पाहून सगळेच थक्क झालेत. नेटकरी व्हिडिओ पाहून यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. हे बाबा कायम उन्हामध्येच राहणार आहेत का ते कधीही सावलीमध्ये जाणार नाहीत का? अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.
बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ५ लाखांहून अधिक व्ह्युव्ज मिळालेत. अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, भारत माता की जय... भारतामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी जुगाड शोधला जातो असं त्यांचं म्हणण आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.