Delhi Metro News :  Saam tv
देश विदेश

Delhi Metro: भयंकर घडलं! दरवाज्यात साडी अडकली, मेट्रोने फरफटत नेले, ३५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Delhi Metro Accident: इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गुरुवारपासून महिला कोमात होती. शनिवारी दुपारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

Gangappa Pujari

Delhi Metro News:

मेट्रो ट्रेनच्या दरवाजात साडी व जॅकेट अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिल्लीच्या इंद्रलोक मेट्रो स्थानकावर गुरूवारी (१३, डिसेंबर) ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून प्रवाशांनी मेट्रो प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर गुरुवारी दुपारी एका रिना देवी (वय, ३५) नामक महिलेची साडी मेट्रोच्या गेटमध्ये अडकली. याचवेळी ट्रेन पुढे निघाली. ज्यामुळे महिला मेट्रोसह फरफटत पुढे गेली. यावेळी प्लॅटफॉर्मवरील लोकांनी आरडा ओरडा केला, मात्र ट्रेन थांबली नाही. फलाटाच्या शेवटी असलेल्या गेटला धडकल्याने महिला रुळावर पडली. त्यामुळे महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून जाणाऱ्या ट्रेनच्या ऑपरेटरची या महिलेवर नजर पडली. त्यांनी ही माहिती नियंत्रण कक्षाला दिली. मेट्रोच्या टीमने घटनास्थळ गाठून महिलेला तीन हॉस्पिटलमधून उपचारासाठी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पाठवले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गुरुवारपासून महिला कोमात होती. शनिवारी दुपारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या घटनेनंतर मेट्रो प्रशासनाच्या भोंगळ कारभावावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ज्यानंतर दिल्ली मेट्रोच्या दरवाजाचा सेंन्सर बिघडल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मेट्रो सुरक्षा प्रशासनाने याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT