नागपूरमधील बाजारगाव येथील सोलार कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६ महिलांचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. सरकारकडून मृत्यांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बचावकार्यासाठी राज्य आपत्ती विभाग पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. (Latest Marathi News)
नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः IG, SP, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सोलार कंपनी भारतातील अनेक संरक्षण क्षेत्राशी संबंधीत कंपन्यांना दारुगोळा पुरवठा करते. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके याच कंपनीत तयार केली जातात. हेच काम करत असताना झालेल्या स्फोटात कामगारांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्के, मिता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता युकी, मोसम पटले यांचा समावेश आहे. घटनास्थळ संपूर्ण सील करण्यात आले आहे. जोपर्यंत घटनास्थळ सुरक्षित असल्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत मृतदेह बाहेर काढता येणार नाही, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.