Delhi Shahdara Area Building Fire  Saam TV
देश विदेश

Delhi Fire News: दिल्लीत ४ मजली इमारतीला भीषण आग; पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू, थरारक VIDEO

Delhi Building Fire: दिल्लीतील शहादरा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका ४ मजली इमारतीला गुरुवारी (ता. १४) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला.

Satish Daud

Delhi Shahdara Area Building Fire

दिल्लीतील शहादरा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका ४ मजली इमारतीला गुरुवारी (ता. १४) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीचा भडका उडाला. आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवासी जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले. मात्र, या आगीत पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या भीषण आगीचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मनोज (वय ३०), सुमन (वय २८) यांच्यासह ५ वर्षीय चिमुकला आणि ३ वर्षाची चिमुकली आगीत मृत्युमुखी पडले आहेत. (Latest Marathi News)

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील शहादरा परिसरातील शास्त्रीनगर भागात ४ मजली इमारत आहे. गुरुवारी (ता. १४) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने संपूर्ण इमारतीला विखळा घातला.

आग लागल्याचं कळताच मोठी आरडाओरड सुरू झाली. इमारतीतील रहिवाशांनी जीवाच्या आकांताने बाहेर धाव घेतली. मात्र, एका नवविवाहित जोडप्यासह दोन चिमुकले आगीच्या भक्षस्थानी सापडले. श्वास घुसमटल्याने त्यांना इमारतीच्या बाहेर पडता आले नाही.

परिणामी आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. या आगीत तीन पुरुष आणि चार महिला देखील जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

SCROLL FOR NEXT