Weather Update Saam Tv
देश विदेश

Weather Update: महाराष्ट्रात उकाडा आणि उन्हाचे चटके वाढण्याची शक्यता, 'या' जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

Weather Forecast: दिल्ली एनसीआरच्या तापमानात घसरण झाली आहे. उत्तर-पश्चिम दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडी आणखी वाढली आहे. तर महाराष्ट्र राज्यातील तापमानात मात्र वाढ होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Maharashtra Weather Update

दिल्ली एनसीआरमध्ये तीन दिवसांच्या पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून हवामान स्वच्छ होत आहे. कडक सूर्यप्रकाश आहे. उत्तर-पश्चिम दिशेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी आणखी वाढलीय. बुधवारी किमान तापमानात एक अंशाने घट होऊन तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत ( Weather Update) पोहोचले. तर कमाल तापमान अजूनही 20 अंश सेल्सिअसवर कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी दिल्ली एनसीआरच्या तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.  (Latest Weather Update)

उत्तर भारतात आता थंडीचा कडाका कमी झालाय. मंगळवारी हरियानातील कर्नाल येथे नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं (Weather Forecast) गेलं. उर्वरित देशाच्या किमान तापमानात वाढ झालीय. मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयात झालाय. यामुळं विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक असं हवामान होतंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रात किमान तापमान वाढ

किमान तापमानात झालेल्या वाढीमुळं महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात थंडी कमी झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा मात्र कायम आहे. आज राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होतंय. शुक्रवारपासून हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.

महाराष्ट्र राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झालीय. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी १० अंश तापमान नोंदले गेलं आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान ११ ते २२ अंशांच्या दरम्यान (Maharashtra Weather Update) आहे. तर कमाल तापमानात वाढ झाल्यानं सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अनेक ठिकाणी तापमान ३३ अंशांच्या वर आहे. आज किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

दिल्ली एनसीआरच्या तापमानात घसरण

आठवड्याच्या अखेरीस उत्तर-पश्चिम दिशेकडून येणारे थंड वारे कमी होण्याची शक्यता आहे. यामुळं सकाळी आणि संध्याकाळी कडाक्याच्या थंडीपासून थोडा आराम मिळेल. हवामान खात्याच्या अहवालानुसार, मंगळवारी कमाल तापमान 21 अंश नोंदवले गेले (Delhi Weather Update) आहे. किमान तापमान 8 अंश सेल्सिअस होते. बुधवारी कमाल तापमानात किंचित घट झाली असताना, किमान तापमानात एक अंशाने घट झाली.

गुरुवारी किमान आणि कमाल तापमानात आणखी एक अंशाने घट होण्याची शक्यता आहे. सध्या दिल्ली ( (Delhi) एनसीआरमध्ये सुमारे 12 ते 20 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. तर आर्द्रता 40 ते 98 टक्क्यांपर्यंत नोंदवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT