Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Delhi Liquor Scam : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक; चौकशीनंतर ईडीने केली कारवाई

ED Arrest Delhi CM : दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केलीय. अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलीय.

Bharat Jadhav

Enforcement Directorate Arrested Delhi Cm Arvind kejriwal In Liquor Scam :

लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय. ईडीच्या टीमने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलीय. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने आधी त्याच्या घराची झडती घेतली आणि नंतर त्याची चौकशी केली, यानंतर तपास यंत्रणेने त्यांना अटक केली. दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. (Latest News)

दरम्यान आज ईडीचे अधिकारी शोध वॉरंट घेऊन तपास यंत्रणेचे पथक केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेतली पीएमएलएच्या कलम ५० अंतर्गत मुख्यमंत्र्यांचा जबाब नोंदवण्यात आला त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय.

ईडीच्या पथकाने केजरीवाल यांना काही प्रश्न केली. केजरीवाल यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल देखील यावेली जप्त करण्यात आले होते. प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीच्या पथकाने अरविंद केजरीवाल यांना अटक केली. दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अटकेच्या कारवाईची माहिती दिलीय. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी केंद्र सरकार आणि तपास यंत्रणेविरोधात घोषणाबाजी केलीय. दरम्यान दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर कलम १४४ लागू केले आहे.

काय आहे कथित दिल्ली दारू घोटाळा

  • नवीन मद्य धोरणामुळे मद्याची सरकारी दुकानं बंद झाली होती आणि खासगी परवाने सरकारने जारी केले होते.

  • दारू पिण्याचं वयही दिल्ली सरकारने २५ वरून २१ वर केले होते.

  • सरकारचा महसूल वाढवणं, मद्य माफियांचा प्रभाव कमी करणं, ग्राहकांची सोय आणि मद्याचा काळा बाजार रोखणं हे धोरणाचं मुख्य उद्दिष्ट होतं

  • हे धोरण नोव्हेंबर २०२१ पासून अंमलात आले होते.

  • या धोरणामुळे मद्याचा दर ठरविण्याची मुभा मालकांना दिली होती, त्यामुळे एमआरपीवर सूट मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती.

  • सर्व दुकानं पहाटे तीन वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा दिली होती, होम डिलिव्हरीचा पर्यायही त्यांनी ठेवला होता.

  • त्यामुळे परिणामी दिल्लीत काही काळ मद्यावर मोठी सूट दिली जात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT