काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने तिसऱ्या यादीत ५७ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील ७ लोकसभा मतदारसंघाचा सामावेश आहे. राज्यातील उमेदवारांमध्ये शाहू महाराज, प्रणिती शिंदे, रविंद्र धंगेकर आदी नेत्यांचा सामावेश आहे. (Latest Marathi News)
काँग्रेसने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत अरुणाचल प्रदेशमधील २ उमेदवार, गुजरातमधील ११ उमेदवार, कर्नाटकातील १७ उमेदवार, महाराष्ट्रातील ७ उमेदवार,राजस्थानमधील ६ उमेदवार, तेलंगानाचे ५ उमेदवार, पश्चिम बंगालमधील ८ उमेदवार आणि पुदुच्चेरीतील एका उमेदवाराचा सामावेश आहे.
काँग्रेसने पहिल्या यादीत ३९ उमेदवारांची नावे घोषित केली. त्यानंतर दुसऱ्या यादीत ४३ जणांची नावे जाहीर केली. त्यानंतर तिसऱ्या यादीत ५७ जणांची उमेदवारी जाहीर केली. या प्रकारे काँग्रेसने आतापर्यंत १३९ जणांची उमेदवारी जाहीर केली. दक्षिणेतील बहुतांश राज्यातील उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहीर केली आहेत.
कोणाला कुठून तिकीट मिळालं?
गुजरातच्या गांधीनगरमधून सोनल पटेल, सूरतमधून निलेश कुंबानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नबाब तुकी यांना अरुणाचल पश्चिममधून उमेदवारी मिळाली आहे. कर्नाटकाच्या चिक्कोडीमधून प्रियंका जारकीहोली यांना उमेदवारी मिळाली आहे.
सुनील शर्मा यांना राजस्थानच्या जयपूरमधून ओळख मिळाली आहे. पालीतून संगीता बेनिवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर अधीर रंजन चौधरी यांना बरहामपूरमधून तिकीट मिळालं आहे. त्यांची लढत थेट माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्याशी होईल. तर मालदा दक्षिणमधून अबू हासेम खान चौधरी यांचा मुलगा ईशा खान चौधरी यांना उमेदवारी मिळाली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघ - रविंद्र धंगेकर
कोल्हापूर - शाहू महाराज
सोलापूर - प्रणिती शिंदे
अमरावती - बळवंत वानखेडे
नंदुरबार - गोवाल पाडवी
नांदेड - वसंत चव्हाण
लातूर - शिवाजीराव कालगे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.