ED Files Chargesheet Against Arvind Kejariwal Saam Tv
देश विदेश

Delhi Liquor Policy Scam: अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडीने दाखल केली चार्जशीट

ED Files Chargesheet Against Arvind Kejariwal: ईडीने या प्रकरणात दाखल केलेले हे आठवे आरोपपत्र आहे. ईडीने सांगितले की, या आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे.

Priya More

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात (Delhi Liquor Policy Scam) अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने आठवे आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने दिल्लीच्या दिल्ली राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हे आरोपपत्र दाखल केले. ईडीने या प्रकरणात दाखल केलेले हे आठवे आरोपपत्र आहे. ईडीने सांगितले की, या आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejariwal) आणि आम आदमी पार्टीचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे.

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने दाखल केलेले हे आठवे आरोपपत्र आहे. या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हे पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आणि ईडीच्या कोठडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे.

ईडीने सुप्रीम कोर्टाला सांगितले होते की, ते लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांना दारू घोटाळा प्रकरणात आरोपी बनवेल. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ईडीतर्फे हजर झालेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी सांगितले की, 'आम्ही अरविंद केजरीवाल आणि आप यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव देत आहोत. आम्ही ते लवकरच करू. त्याची प्रक्रिया सुरू आहे.'

कथित दिल्ली मद्य धोरण मुद्द्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या सुनावणीदरम्यान ईडीने हे सांगितले. केजरीवाल यांनी 100 कोटी रुपयांची लाच मागितली होती आणि गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्याचा वापर आपने केला हे दाखवण्यासाठी तपास यंत्रणेकडे पुरेसे पुरावे आहेत, असा दावा राजू यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, आमच्याकडे पुरवा आहे की अरविंद केजरीवाल सात-तारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. ज्याचे बिल या प्रकरणातील एका आरोपीने अंशतः दिले होते. या प्रकरणात केजरीवाल यांची महत्वाची भूमिका होती'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT